एक्स्प्लोर
रेणुका तलवारचा भारदस्त बंगला, किंमत 435 कोटी!
नवी दिल्ली : प्रख्यात डीएलएफ या कंपनीचे मालक के पी सिंह यांच्या मुलीने भारदस्त घर खरेदी केलं आहे. रेणुका तलवार यांनी खरेदी केलेल्या घराची किंमत एक-दोन नव्हे तर तब्बल 435 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे रेणुका तलवार यांच्या या भारदस्त बंगल्याची देशभरात चर्चा सुरु आहे.
हा बंगला रियल इस्टेट डेव्हलपर टीडीओ इंफ्राकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक कमल तनेजा यांचा होता. तो त्यांनी रेणुका तलवार यांना विकला.
4925 स्क्वेअर मीटर प्लॉटमध्ये 1189 स्क्वेअर फुटांचा हा बंगला आहे. हा बंगला 8.8 लाख रुपये प्रती स्वेअर मीटर या दराने विकला.
सध्याच्या सर्कल रेटनुसार या बंगल्याची किंमत 383 कोटी रुपये इतकी आहे.
यापूर्वी दिल्लीतील पृथ्वीराज रोड परिसरात 173 कोटीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील झाली होती.
रेणुका तलवार या डीएलएफ कंपनीचे मालक के पी सिंह यांची मुलगी आहे. रेणुका यांचे पती जी एस तलवार हे डीएलएफ कंपनीत कार्यकारी संचालक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement