Today In History : नोकरीमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण, चाफेकरांनी रँडला गोळ्या झाडल्या, इतिहासात आज
1994 मध्ये आजच्याच दिवशी महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले.
On this day in history june 22 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 22 जून रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. महाराष्ट्रात महिलांना नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण जाहीर झाले.. आजच्याच दिवशी चाफेकरांनी चार्ल्स रँड या मुलखी अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या होत्या. त्याशिवाय २००७ मध्ये आजच्या दिवशी अंतराळवीर सुनिता विल्यम्स १९५ दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या होत्या. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात महिलांना नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण -
1994 मध्ये आजच्याच दिवशी महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय होता. महिला व बाल कल्याण विकास खात्याने शासकीय, निमशासकीय आणि शासन अनुदानित संस्था यांच्या सेवेत भरतीसाठी महिलांना ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय आजच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल १९९४ पासून झाली.
1897 : दामोदर चाफेकरांनी रँडला गोळ्या झाडल्या -
पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्याला क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर रँड काही काळ कोमात राहिला, तीन जुलै १८९७ रोजी त्याचं निधन झालं. दामोदर चाफेकरांनी रँडला गोळ्या झाडल्या
2007 : सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या -
भारतीय वंशांची अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आल्या. महिला अंतराळवीर म्हणून 195 दिवस अवकाशात राहण्याचा विश्वविक्रम केला. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या माध्यमातून अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी महिला आहे. सुनिता अमेरिकेतील सर्वात जास्त स्टॅमिना असलेल्या लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा स्टॅमिना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
इस्रोचा विक्रम -
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने 22 जून 2016 रोजी विश्वविक्रम रचला होता. आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण २० उपग्रह प्रक्षेपित (‘पीएसएलव्ही-सी३४’) करण्याचा विक्रम इस्त्रोने केला. इस्रोच्या या प्रक्षेपकामध्ये समाविष्ट असलेल्या २० उपग्रहांमध्ये गुगल कंपनीच्या उपग्रहासह भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दोन उपग्रहांचा देखील समावेश होता. इस्रोने याआधी पीएसएलव्हीच्या मदतीने २८ एप्रिल २००८ रोजी १० उपग्रह एकाच वेळी सोडले होते तर अमेरिकेच्या मिनोटॉर १ अग्निबाणाने २९ उपग्रह एकाच वेळी सोडले होते.
काळजाला हात घालणारा गायकाचा जन्म -
आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायक मुकेश यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. मुकेश यांच्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यांचं निधन होऊन आज अनेक वर्ष लोटली. मात्र त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ते आजही आपल्याबरोबर आहेत. त्यांची गाणी आजही प्रत्येक तरुणाच्या ओठी ऐकायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला. तीस वर्षांच्या करिअरमध्ये मुकेश यांनी दहा हजारांपेक्षा जास्त गाण्यांना आपला आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषामध्येही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. ‘नैन का चैन चुराकर ले गयी कर गयी निंद हराम’‘दो रोज में प्यार का आलम गुजर गया’इस दिल के टुकडे हजार हुए, कोई इधर गिरा कोई उधर’, ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’ यासारखी हजारो गाणी मुकेश यांनी गायली आहेत.
अमरिश पुरी यांची जयंती -
हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस. अमरीश पुरी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवांशहर येथे झाला. वयाच्या 39 व्या वर्षी अमरीश पुरींनी 'रेशमा और शेरा' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'मिस्टर इंडिया' मधील 'मोगॅम्बो' असो, वा 'घातक'मधील 'शंभू नाथ' किंवा 'डीडीएलजी'मधील 'बाबूजी'... अमरीश पुरींनी प्रत्येक भूमिका अजरामर केली. अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर यांच्यासोबत 5 जानेवारी 1957 रोजी मुंबईतील वडाळ्यातील श्रीकृष्ण मंदिरात लगीनगाठ बांधली. अमरीश आणि उर्मिला यांना दोन मुलं आहेत. मुलगा राजीव पुरी हा व्यावसायिक आहे, तर मुलगी नम्रता डॉक्टर आहे. अमरीश पुरी यांचा 1967 पासून सुरु झालेला सिनेप्रवास शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत सुरु राहिला. 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं.
1986: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात फिफा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी हँड ऑफ गॉड गोल केला.
1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
1908 : महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत आणि तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म.
1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
1893 : युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया 358 खलाशी आणि अधिकाऱ्यांसह बुडाली.
1983 : तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.