एक्स्प्लोर
VIDEO : नदीच्या मधोमध अडकलेल्या तिघांच्या सुटकेचा थरार
धर्मशाला : नदीच्या पाण्यात अडकलेल्या तीन पर्यटकांच्या सुटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हिमाचल प्रदेशमधील धर्मशालातल्या भागसुनाग भागात 27 जून रोजी हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
पंजाबमधून आलेले तीन तरुण धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पिकनिकला आले होते. पाण्याच्या प्रवाहासमोर असलेल्या दगडावर उभे राहून ते फोटो काढत होते. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याचा अंदाज त्यांना आला नाही.
चारही बाजुने पाण्याचा जोरदार लोंढा वाहायला लागल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. सुमारे 10 ते 15 स्थानिक तरुण त्यांच्या बचावासाठी आले. व्हिडिओमध्ये चार ते मिनिटांचा सुटकेचा थरार दिसत असला, तरी त्याहून अर्धा तास तिघांची मृत्यूशी झुंज सुरु होती.
अखेर कोणीतरी शक्कल लढवून शर्ट एकमेकांना बांधून त्याचा दोर केला. सुरुवातीला एक तरुण शर्टांच्या मदतीने नदीच्या प्रवाहातून पैलतीरावर आला. त्यानंतर उरलेले दोघे जण तशाचप्रकारे नदीकिनारी पोहचले.
पावसाळी पर्यटनासाठी अनेक जण धबधबे, नदी यासारख्या ठिकाणी जातात. मात्र निसर्गाचा आनंद लुटताना बाळगलेला निष्काळजीपणा अशावेळी अंगलट येण्याची भीती असते. त्यामुळे पोलिस, प्रशासन यांच्यातर्फे वारंवार काळजी बाळगण्याचं, अतिउत्साह न दाखवण्याचं आणि विनाकारण साहस न करण्याचं आवाहन केलं जातं. धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता थोडीशी सतर्कता बाळगल्यास तुमचा जीव धोक्यात न येता वर्षासहलीचा आनंद घेता येईल.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement