एक्स्प्लोर
Advertisement
#देशकामूड : निवडणुका झाल्यास एनडीएला संपूर्ण बहुमत : ABP सर्व्हे
नवी दिल्ली : 26 मे रोजी नरेंद्र मोदी सरकार तीन वर्ष पूर्ण करत आहे. तीन वर्षांत मोदींनी कशी कामगिरी केली? देशातील नागरिकांना त्यांच्याविषयी काय वाटतं? हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज, सीएसडीएस-लोकनीतीने सर्व्हे घेतला. देशात आता निवडणुका झाल्यास जनतेचा कौल कोणाला असेल, सध्या देशाचा मूड काय आहे, हे समोर आलं आहे.
सर्व्हेनुसार देशात मतांची टक्केवारी काय?
एबीपी न्यूज, CSDS आणि लोकनीतीच्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या व्होट शेअरमध्ये सात टक्क्यांची वाढ झाली आहे. आता निवडणुका झाल्यास एनडीएला 45 टक्के मतं मिळतील, तर यूपीएला 27 टक्के आणि इतरांना 22 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच निवडणुका झाल्यास एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल.
एबीपी न्यूज, CSDS आणि लोकनीतीच्या सर्वेक्षणानुसार :
देशात मतांची टक्केवारी काय?
एनडीए : 45 टक्के
यूपीए : 27 टक्के
अन्य : 22 टक्के
आता निवडणुका झाल्यास कोणाला सत्ता?
एनडीए : 331 जागा
यूपीए : 104 जागा
अन्य : 108 जागा
मोदी सरकारची कामगिरी कशी?
खूप चांगली : 23 टक्के
चांगली : 46 टक्के
वाईट : 9 टक्के
खूप वाईट : 15 टक्के
पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती?
नरेंद्र मोदी : 44 टक्के
राहुल गांधी : 9 टक्के
ममता बॅनर्जी : 2 टक्के
नितीश कुमार : 1 टक्का
कसा झाला सर्व्हे?
एक मे ते 15 मे या कालावधीत एबीपी न्यूज, CSDS आणि लोकनीतीने हे सर्वेक्षण घेतलं. 19 राज्यांतील 146 विधानसभा मतदारसंघामधल्या 584 पोलिंगमधील 11 हजार 373 मतदारांशी बातचित करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement