एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटाबंदीला दोन महिने पूर्ण, चलनकल्लोळ 16 मार्चपर्यंत संपणार?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यानंतरही अनेक ठिकाणी नोटांचा तुटवडा जाणवत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार हा चलनकल्लोळ 16 मार्चपर्यंत संपू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 15 लाख 44 हजार कोटी रुपयांच्या 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यानंतर 9 नोव्हेंबरपासूनच बाजारात चलनकल्लोळ निर्माण झाला. देशातील चारही प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटांची छपाई युद्धपातळीवर चालू आहे. मात्र अद्यापही नोटांचा तुटवडा काहीशा प्रमाणात जाणवत आहे.
चलनकल्लोळ कधी संपणार?
रिझर्व्ह बँकेकडून सध्या ज्या वेगाने नव्या नोटांची छपाई सुरु आहे, त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत रद्द केलेल्या नोटांपैकी 44 टक्के नोटांची भरपाई झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत हा आकडा 67 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असं एसबीआयचे मुख्य अर्थतज्ञ सौम्यकांती घोष यांचं मत आहे.
जानेवारी अखेरपर्यंत बाजारातील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली असेल आणि फेब्रुवारीपर्यंत 80 ते 89 टक्के नव्या नोटा छापल्या जातील. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत चलनतुटवडा भरुन निघेल, असं सौम्यकांती घोष यांचं मत आहे.
नोटाबंदीनंतर म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या स्वरुपात 15 लाख 44 हजार कोटी रुपये चलनात होते. तर बँक आणि बाजारात मिळून 2 लाख 53 हजार कोटी रुपये 100-50 रुपयांच्या स्वरुपात होते.
नोटाबंदीनंतर युद्ध पातळीवर नव्या नोटांची छपाई
नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात चलनाचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर देशातील सर्व प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटांची युद्धपातळीवर छपाई सुरु करण्यात आली. भारतात नाशिक, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि म्हैसूर या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस आहेत.
नोटाबंदीनंतर 10 नोव्हेंबरला बँकांचे व्यवहार सुरु झाले. त्यानतंर 10 डिसेंबरपर्यंत बँकांकडून नव्या नोटांमध्ये 4 लाख 61 हजार कोटी रुपये ग्राहकांना वाटप केले.
11 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांमध्ये 2 लाख 24 हजार कोटी रुपये ग्राहकांना वाटप करण्यात आले.
बाजारात अगोदरच उपलब्ध असलेल्या 100-50 च्या नोटा मिळून 30 डिसेंबरपर्यंत एकूण 9 लाख 38 हजार कोटी रुपये चलनात आले.
बँकांकडून ग्राहकांना दररोज 11 हजार कोटी रुपयांची वाटप चालू आहे. याप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत 3 लाख 47 हजार कोटी रुपयांची ग्राहकांना वाटप करण्यात येईल. म्हणजेच एवढे पैसे आणखी चलनात येतील.
म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत बाजारात 10 लाख 32 हजार कोटी रुपये चलनात येतील. स्टेट बँकेच्या अंदाजानुसार 10 लाख कोटी रुपये चलनात येताच परिस्थिती सुधारेल.
16 मार्चपर्यंत चलनकल्लोळ संपणार?
नोटाबंदीनंतर 15 लाख 44 हजार कोटी रुपये चलनातून हद्दपार झाले. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत चलनात येणारे 10 लाख 32 हजार कोटी रुपये ही जुन्या नोटांच्या रकमेची 67 टक्के रक्कम आहे. याच वेगाने बाजारत पैसे आल्यास 16 मार्चपर्यंत 15 लाख 44 हजार कोटी रुपये चलनात येतील. त्यामुळेच 16 मार्चपर्यंत चलनकल्लोळ संपेल, असं बोललं जातंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
क्राईम
क्रीडा
Advertisement