(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Violence | हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू, 186 जखमी
उत्तर पूर्व दिल्लीतील मौजपुर परिसरात मंगळवारी देखील हिंसाचार कायम आहे. मौजपुरमध्ये संतप्त जमावाने प्रक्षोभक घोषणा देत दुचाकीला आग लावली.
नवी दिल्ली : सीएएवरून राजधानी दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचराची धग आजही कायम आहे. या हिंसाचाराच एकूण दहा जण मृत्यूमुखी पडले आहे. हिंसाचारामध्ये 56 पोलिसांसह 130 नागरिक जखमी झाल्याची माहिती दिल्ली पीआरओ एम एस रंधावा यांनी दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Delhi Police PRO MS Randhawa on violence in North East Delhi: 56 police personnel injured, head constable Rattan Lal has lost his life, DCP Shahdara also suffered head injuries; 130 civilians injured pic.twitter.com/XkABpqpGa4
— ANI (@ANI) February 25, 2020
सोमवारी (24 फेब्रुवारी) आंदोलनाला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात एका हेड कॉन्स्टेबलसह सात जणांचा मृत्यू झाला. उत्तर पूर्व दिल्लीतील मौजपुर परिसरात मंगळवारी देखील हिंसाचार कायम आहे. मौजपुरमध्ये संतप्त जमावाने प्रक्षोभक घोषणा देत दुचाकीला आग लावली. अग्निशामक दलाची एक गाडी या ठिकाणी रवाना झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाफराबाद, मौजपुर, चांडबाग, खुरेजी खास आणि भजनपुरा येथे सीएए समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात 48 पोलिस कर्मचारी आणि 98 नागरिक जखमी झाले आहे. परिसरात लागलेल्या आग विझवताना अग्निशामक दलाचे तीन कर्मचारी जखमी झाले आहे. खुरेजी परिसरात मोठ्या संख्येने पोलिस आणि आरएएफच्या जवानांना तैनात करण्यात आला आहे.
ईशान्य दिल्लीत उसळलेल्या या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे हेडकॉन्स्टेबल रतन लाल हे शहीद झाले असून त्यांच्या पार्थीवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक उपस्थित होते.
Delhi: Lt Governor Anil Baijal and Police Commissioner Amulya Patnaik pay tribute to Delhi Police Head Constable Rattan Lal who lost his life during clashes in North East Delhi yesterday. pic.twitter.com/XmDcIYjd7s
— ANI (@ANI) February 25, 2020
हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यांच्या हौतात्म्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांनी दिली.
Delhi Riots Firing | मौजपुरात खुलेआम गोळीबार करणारा शाहरुख ताब्यात, आठ वेळा केला गोळीबार
संबंधित बातम्या :
दिल्लीतल्या हिंसाचाराची केंद्राकडून गंभीर दखल, अमित शाह आणि केजरीवाल यांच्यात बैठक
राजधानीत CAA समर्थक, विरोधकांमध्ये हिंसाचार; उत्तर-पूर्व दिल्लीत जमावबंदी
दिल्लीत सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीत हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू