Air Pollution : दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर, खराब हवेमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ, एका रिपोर्टमधून माहिती समोर
Most Polluted Cities in world : जगभरातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे लोकांना कर्करोगासह अनेक प्रकारचे घातक आजार होत आहेत.
Most Polluted Cities in world : भारतात हवेत वाढणारे प्रदूषण हे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. जगभरातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे लोकांना कर्करोगासह अनेक प्रकारचे घातक आजार होत आहेत. प्रदूषणामुळे लोकांचा मृत्यूही होत आहे. जगभरातील प्रदूषणाच्या स्थितीबाबत एक अहवाल जारी करण्यात आला असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये दिल्ली आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दिल्ली PM 2.5 म्हणजेच particle pollution सर्वोच्च पातळीवर असून पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकाता (84 माइक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर) दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर नायजेरियातील कानो शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्लीतील वायू प्रदुषणाची पातळी वाढली
यूएस-आधारित संशोधन संस्था हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट (HEI) च्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर इनिशिएटिव्हच्या अभ्यासानुसार, 2019 मध्ये दिल्ली आणि कोलकाता येथे प्रदूषणामुळे 1 लाख लोकसंख्येमागे 106 आणि 99 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच पीएम 2.5 ची पातळी वाढल्याने हे मृत्यू झाले आहेत. 2019 मध्ये, दिल्लीतील पीएम 2.5 पातळी प्रति घनमीटर 110 मायक्रोग्रॅम होती, जी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कोलकाता (84 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) आहे. हा अहवाल 2010 ते 2019 या कालावधीत 7,239 शहरांमध्ये (किमान 50,000 लोकसंख्येसह) वायू प्रदूषण आणि संबंधित आरोग्यावरील परिणामांवरील डेटा सादर करतो.
पीएम 2.5 धोकादायक
PM2.5 हे सूक्ष्म कण (2.5 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे) वातावरणात असतात, जे श्वासोश्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि फुफ्फुसात सूज निर्माण करतात. दक्षिणपूर्व आशियातील शहरांमध्ये पीएम 2.5 ची पातळी झपाट्याने वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासातून 7239 शहरांमधील वायू प्रदूषणाची स्थिती समोर आली आहे. 2010 ते 2019 या कालावधीत पीएम 2.5 मुळे मृत्युदरात सर्वाधिक वाढ झालेली सर्व 20 शहरे दक्षिण-पूर्व आशियातील आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. ज्यामध्ये इंडोनेशियातील 19 शहरे आणि मलेशियातील एका शहराचा समावेश आहे. 2019 मध्ये PM 2.5 मुळे 1.7 दशलक्षाहून अधिक मृत्यूची नोंद झालेल्या शहरांपैकी 20 शहरे आफ्रिका आणि पूर्व आशियामधील आहेत. इंडोनेशियातील 19 शहरे आणि मलेशियातील एका शहराचा समावेश आहे. मध्य युरोपमधील आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करणारी 7,239 शहरे आहेत.
मध्यम-उत्पन्न देशांमधील शहरांमध्ये PM2.5 प्रदूषण सर्वाधिक
अहवालात असे म्हटले आहे की नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) प्रदूषणाचे भौगोलिक नमुने पीएम 2.5 प्रदूषणाच्या नमुन्यांपेक्षा बरेच वेगळे आहेत. पीएम 2.5 प्रदूषण कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील शहरांमध्ये सर्वाधिक आहे, तर सर्व उत्पन्न स्तरांच्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये NO2 पातळी जास्त आहे. जवळजवळ सर्व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (103 शहरांपैकी 81) NO2 एक्सपोजर नोंदवले गेले. जे जागतिक सरासरी 15.5 मायक्रोग्राम प्रति घनमीटरपेक्षा जास्त आहे.
पीएम 2.5 मुळे अनेक आजार होतात
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीएम 2.5 चे प्रमाण जास्त असल्याने फुफ्फुसाचा कर्करोग आणि अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो.