एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पतंजलीला झटका, साबणाची जाहिरात हायकोर्टाने थांबवली
रॅकिट बेनकीजरनुसार, जाहिरातीमध्ये असा साबण दाखवलाय, जो आकाराने आणि रंगाने आपल्याच उत्पादनासारखा आहे. शिवाय त्याचा उल्लेख 'ढिटॉल' म्हटलं आहे.
नवी दिल्ली : पतंजली आयुर्वैदच्या एका जाहिरातीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. डेटॉल बनवणारी कंपनी रॅकिट बेनकीजरने या प्रकरणी याचिका दाखल केली होती.
योगगुरु रामदेव बाबांच्या कंपनीची ही जाहिरात रॅकिटच्या डेटॉल ब्रॅण्डची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप आहे. याआधी हिंदुस्तान युनिलिव्हरनेही याचिकेद्वारे या जाहिरातीवर बंदी आणली होती.
रॅकिट बेनकीजरनुसार, जाहिरातीमध्ये असा साबण दाखवलाय, जो आकाराने आणि रंगाने आपल्याच उत्पादनासारखा आहे. शिवाय त्याचा उल्लेख 'ढिटॉल' म्हटलं आहे.
"हायकोर्टाने या जाहिरातीवर अंतरिम बंदी घातली आहे. पतंजलीने सुरुवातीला ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड केली, नंतर आयुर्वेद कंपनीने रविवारी या जाहिरातीचं प्रसारण केलं. यासंदर्भात पाठवलेल्या ई-मेलला पतंजलीने उत्तर दिलं नाही," असं रॅकिट बेनकीजरच्या वकील नॅन्सी रॉय यांनी दिली.
याआधी मुंबई उच्च न्यायालयाने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या याचिकेवर सुनावणी करताना पतंजलीच्या या जाहिरातीवर पुढील सुनावणीपर्यंत बंदी घातली आहे.
जाहिरातीत लक्स, पेअर्स, लाईफबॉय आणि डव एचयूएलच्या साबणाच्या ब्रॅण्ड्सची अप्रत्यक्षरित्या नावं घेतली आहे. रसायनयुक्त साबणांचा वापर करु नका आणि नैसर्गिक साबण वापरा, असा असं जाहिरातीत म्हटलं आहे. पतंजलीची ही जाहिरात पहिल्यांदा 2 सप्टेंबरला प्रसारित झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement