Delhi Elections 2020 : 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान; 11 फेब्रुवारीला निकाल
2015मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळालं होतं. आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला होता. तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत.
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्या आहेत. दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी 2020मध्ये निवडणूका होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहिर करण्यात येतील. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच या निवडणुकीत 1 कोटी 46 लाख मतदार मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 3 हजार 750 मतदान केंद्रांवर घेतले जाईल. 90 हजार कर्मचारी निवडणुकांसाठी तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा देण्यात येतील. तसेच 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पोस्टल बॅलेटद्वावर मतदान करू शकतील, असंही मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 22 फेब्रुवारी 2020 रोजी संपणार आहे. 14 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी अधिसूचना जारी करण्यात येईल. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख 21 जानेवारी असणार आहे. तसेच या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. जर एखाद्या उमेदवारास अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्याची शेवटची तारिख 24 जानेवारी असेल. या सर्व प्रक्रियेनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच मतदानानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
2015 विधानसभा निवडणुकांचे निकाल
2015मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळालं होतं. आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला होता. तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत.
2015मध्ये मिळालेल्या मतांचं प्रमाण
2015मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टिने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडणुकांच्या निकालामध्ये आम आदमी पार्टिला एकूण 54.34 टक्के मतं मिळाली होती. भाजपने 69 जागा या निवडणुकीत लढवल्या असून त्यांना 32.19 टक्के मतं मिळाली होती. तसेच काँग्रेसने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले असून 9.65 टक्के मतं मिळाली होती.
संबंधित बातम्या :
2022 साली शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचा संजय राऊत यांचा चंग
CAA ला विरोध केवळ राजकीय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ABP न्यूजला विशेष मुलाखत