एक्स्प्लोर

दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपला महाराष्ट्रातून रसद; राज्यातील दिग्गज नेते प्रचारासाठी राजधानीत

दिल्लीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपचा दिल्लीत प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातून दिग्गज नेते जाणार आहेत. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.

मुंबई : दिल्ली निवडणूकांचे बिगुल वाजले असून दिल्ली काबीज करण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. निवडणुकीतील सर्वेक्षण पाहता आम आदमी पक्षाचे पारडे सध्यातरी जड वाटत आहे. यासाठी भाजपने रणनीती आखली असून दिल्लीच्या निवडणुकीसाठी त्यांना महाराष्ट्रातून रसद पुरवली जाणार आहे. आजपासून महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. राज्यातून एकूण 25 जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे आजपासूनच दिल्लीला प्रचारासाठी रवाना होणार आहेत. तर चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत. निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. विधानसभेसाठी दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. या निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी न्यूजने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनाच पसंती मिळाली आहे. त्यामुळे भाजपने केजरीवाल यांना रोखण्यासाठी रणनीती आखल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून आता महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवर दिल्लीतील प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. नाराज पंकजा मुंडे, खडसेंनाही दिल्लीत जबाबदारी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे दोघे आजपासूनच दिल्लीत प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत. नाराजी नाट्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही दिल्लीत निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तर, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरजित सिंघ ठाकूर यांचाही निवडणूक प्रचारात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नेत्याकडे एकूण 10 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. 2015 विधानसभा निवडणुकांचे निकाल - 2015मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळालं होतं. आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला होता. तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. Special Report | दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची एन्ट्री, सात उमेदवार रिंगणात

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget