एक्स्प्लोर

Corona : राजधानीत पुन्हा लॉकडाऊन? वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासन हायअलर्टवर, दिल्लीत महत्त्वाची बैठक

DDMA Meeting : दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. यासंदर्भात आज दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

Corona in Delhi : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासन हायअलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत उपराज्यपालाच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल. तसेच या बैठकीत पुन्हा मास्क सक्ती लागू करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दिल्लीत पुन्हा मास्क अनिवार्य

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला डीडीएमएने मास्क सक्ती आणि 500 रुपयांचा दंडाचा निर्णय मागे घेतल्यानंतर दिल्लीतील जनतेकडून मास्कच्या वापरात लक्षणीय घट झाली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाची वाढती संख्या पाहता ही परिस्थिती चांगली नाही. बैठकीदरम्यान, दिल्लीत मास्कच्या अनिवार्य वापराच्या कठोर अंमलबजावणीसाठी पुन्हा दंड आकारण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन शिक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्येही मुलांना कोरोनाचा संसर्गाचा फटका बसल्यामुळे डीडीएमएच्या बैठकीत ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण्याच्या पर्यायावरही चर्चा होऊ शकते. विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाबाधित मुलांची संख्येत वाढ होत असल्याने पालकांची चिंताही वाढली आहे. दिल्ली सरकारने शाळेत कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोनाबाधित आढळल्यास विशिष्ट वर्ग किंवा शाळा बंद करण्याचे आदेश शालेय प्रशासनाला दिले आहेत.

वाढत्या संसर्गामुळे केंद्राचं राज्यांना पत्र

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget