AAP : दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न, केजरीवालांच्या 'आप'चे 13 जण फुटले, बंडखोरांचा वेगळा गट स्थापन
AAP Leaders Resign : दिल्लीमध्ये हेमचंद गोयल आणि मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली 13 जणांनी आप पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाने वेगळा गट तयार केला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची सत्ता गेल्यानंतर आता अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली नगर निगम म्हणजे महापालिकेमध्ये 13 नगरसेवकांनी आप पक्षाला रामराम करत वेगळा गट तयार केला आहे. हेमचंद गोयल यांच्या नेतृत्वाकाली 13 जणांनी आप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत इद्रप्रस्थ विकास पार्टी नावाने वेगळा गट तयार केला आहे. मुकेश गोयल हे या पक्षाचे नवे नेते असतील.
AAP 13 Councillors Resign in Delhi : आप पक्षाचे राजीनामा देणारे नगरसेवक
- हेमनचंद गोयल
- दिनेश भारद्वाज
- हिमानी जैन
- उषा शर्मा
- साहिब कुमार
- राखी कुमार
- अशोक पांडेय
- राजेश कुमार
- अनिल राणा
- आम आदमी पार्टी ने
- देवेंद्र कुमार
- हिमानी जैन
Aam Aadmi Party Councillors Resign : महापौर निवडणुकीत आपचे नगरसेवक अनुपस्थित
गेल्या महिन्यात एमसीडी निवडणुका पार पडलेल्या. त्यामध्ये भाजपचे इक्बाल सिंह हे महापौर बनले होते. त्यांनी काँग्रेसच्या मनदीप सिंह यांचा पराभव केला होता. या निवडणुकीवर आपच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बरेच नगरसेवक नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यामधील 13 नगरसेवकांनी आपचा राजीनामा देत वेगळा गट तयार केला आहे.
Indraprastha Vikas Party : 15 नगरसेवक सोबत असल्याचा बंडखोरांचा दावा
आपल्यासोबत आप पक्षातून बाहेर पडलेले 15 नगरसेवक असल्याचा दावा बंडखोरांचे नेते मुकेश गोयल यांनी केला आहे. आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यासमोर हे मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.
मुकेश गोयल आणि हेमचंद गोयल हे आधी काँग्रेस पक्षामध्ये होते. गेल्या निवडणुकीवेळी त्यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला होता. मुकेश गोयल यांनी आप पक्षाकडून आदर्श नगर विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला.
दिल्लीतील राजकारणात खळबळ
दिल्लीमध्ये आप पक्षाच्या नगरसेवकांनी राजीनामा देत वेगळा गट निर्माण केल्यानतंर एकच खळबळ उडाली आहे. आपच्या नगरसेवकांनी राजीनामा दिल्यानंतर आपकडून अधिकृत निवेदन अद्याप आलं नाही.
Maharashtra Pattern In Delhi Politics : दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न
या आधी महाराष्ट्रातही असंच राजकारण पाहायला मिळालं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदारांनी बंड केला. नंतर पुढे जाऊन त्यांनी मूळ पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगानेही त्यांच्या बाजूने निर्णय देत शिवसेना त्यांचीच असल्याचं सांगितलं होतं.
ही बातमी वाचा:
























