26 जानेवारीच्या लाल किल्ल्यावरील गोंधळाची स्क्रिप्ट आधीपासून तयार, SIT च्या चौकशीतून माहिती
लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या SIT चौकशीतून करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या SIT चौकशीतून करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही उपद्रव करण्यासाठी काही खास समूहांना लाल किल्ला आणि आयटीओ वर एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या समूहांचा उद्देश गर्दीत सहभागी होऊन उपद्रवाची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीचा हिस्सा बनवून हिंसेत सहभागी करणे हा होता, अशी माहिती मिळाली आहे.
Farmer Protest : शेतकऱ्यांचा आज देशभर चक्का जाम, संयुक्त शेतकरी मोर्चाकडून 'हे' आवाहन
इकबाल सिंहनं भडकावलं पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल सिंह नावाच्या एका दंगेखोरानं लाल किल्ल्यावर गर्दी जमा केली. त्या गर्दीला भडकावलं आणि लाहोर गेट तोडण्यासाठी सांगितलं. इकबालच्या सांगण्यावरुन उपद्रवी लोकांनी लाहोर गेट तोडलं. दिल्ली पोलिसांनी इकबाल सिंहवर 50 हजार रुपयांचा इनाम ठेवला आहे.
150 जणांना अटक, 44 एफआयआरची नोंद व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने ही छायाचित्रे काढली आणि प्रसिद्ध केली. यापूर्वी गुन्हे शाखेने 12 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 44 एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यामध्ये सुमारे दीडशे जणांची अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत
दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायरल व्हिडिओ, मीडिया कॅमेरे, दिल्ली पोलिसांचे कॅमेरे आणि जनतेच्या आवाहनानंतर पोलिसांना मिळालेल्या सुमारे पाच हजार व्हिडिओंची चौकशी करीत आहे. या तपासानंतर पोलिसांनी या दंगेखोरांना ओळखले. आतापर्यंत त्यांनी 8 दंगेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांचा आज देशभर चक्का जाम
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज 'चक्का जाम' करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील. राकेश टिकैत म्हणाले की, "चक्का जाम वापस घेतलेला नाही. मात्र या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. यूपी आणि उत्तराखंडमधील शेतकरी आपल्या तालुका आणि जिल्हा मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदनं देतील. या निवेदनात तिन्ही कृषी कायदे रद्द करने आणि एमएसपीवर कायद्याची मागणी करतील. शेतकऱ्यांनी हे आंदोलन शांततापूर्ण करावे, असं आवाहन देखील टिकैत यांनी केलं आहे.