एक्स्प्लोर

Farmer Protest : शेतकऱ्यांचा आज देशभर चक्का जाम, संयुक्त शेतकरी मोर्चाकडून 'हे' आवाहन

Farmer Protest Chakka Jam : सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज 'चक्का जाम' करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज 'चक्का जाम' करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्‍का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील.

राकेश टिकैत म्हणाले की, "चक्का जाम वापस घेतलेला नाही. मात्र या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. यूपी आणि उत्तराखंडमधील शेतकरी आपल्या तालुका आणि जिल्हा मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदनं देतील. या निवेदनात तिन्ही कृषी कायदे रद्द करने आणि एमएसपीवर कायद्याची मागणी करतील. शेतकऱ्यांनी हे आंदोलन शांततापूर्ण करावे, असं आवाहन देखील टिकैत यांनी केलं आहे.

दिल्ली नाही होणार चक्का जाम संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)च्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, दिल्लीमध्ये चक्का जाम होणार नाही. कारण तिथं आधीपासून होत असलेल्या आंदोलनामुळं चक्का जाम सारखी परिस्थिती आहे. इथं एन्ट्री मार्ग खुले असतील. जिथं शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे, ते मार्ग मात्र बंद राहतील. 'चक्का जाम' आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अहिंसक असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

टिकैत यांची गांधीगिरी, सरकारनं ठोकले खिळे तिथे वृक्षारोपण आपल्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला नवसंजीवनी देणारे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांची शुक्रवारी गाझीपूर सीमेवर गांधीगिरी पाहायला मिळाली. प्रशासनाने खिळे लावलेल्या ठिकाणी टिकैत वृक्षारोपण करताना दिसले. 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी गाझीपूरसह सर्व आंदोलनस्थळांवर तटबंदी उभारली आहे. गाझीपुरात आंदोलकांची आवक-जावक थांबवण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर खिळे ठोकले होते. दरम्यान, टीकेनंतर अनेक ठिकाणाहून खिळे हटविण्यात आले आहे. राकेश टिकैत यांनी खिळे ठोकलेल्या जागेवर डंपरने माती टाकली आणि नंतर फावड्याने माती पसरवून तिथे वृक्षारोपण केलं.

आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी एक नवा फॉर्म्युला

भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवा फॉर्म्युला दिलाय. टिकैत यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टरवर 15 शेतकरी आणि 10 दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळं या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि नंतर परत जाऊन ते शेतीही करु शकतील.टिकैत यांनी म्हटलं आहे की, शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र सरकारला चर्चा करायचीच नाही. सरकार या आंदोलनाला दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. यामुळं प्रत्येक शेतकरी हा आंदोलनात सहभाग घेईल आणि आंदोलन दीर्घकाळ चालू शकेल, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.

ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत 

टिकैत यांनी म्हटलं आहे की, यामुळं गावांमधील लोकं आंदोलनात जास्तीत जास्त येतील. प्रत्येक गावातून 15 शेतकरी आणि 10 दिवसांसाठी येतील. त्यानंतर दुसऱ्या 15 लोकांचा समूह येईल. त्यानंतर आधीपासून आंदोलनात असलेले शेतकरी आपल्या गावी जाऊन शेती करु शकतील, असं टिकैत म्हणाले.

Farmers Protest | आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली - राकेश टिकैत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. राकेश टिकैत म्हणाले, आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल.

शेतकऱ्यांची दूरावस्था थांबवा नाहीतर... ; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

महत्त्वाच्या बातम्या

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget