![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आरएसएसचे नेते राजेश कुंटेंनी राहुल गांधींना पाठवली 1500 रुपयांची मनीऑर्डर, जाणून घ्या काय आहे कारण
2014 मध्यील भिवंडीतील राहुल गांधींच्या ( Rahul Gandhi) भाषणानंतर राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
![आरएसएसचे नेते राजेश कुंटेंनी राहुल गांधींना पाठवली 1500 रुपयांची मनीऑर्डर, जाणून घ्या काय आहे कारण defamation case rss leader rajesh kunte sent money order of rs 1500 to rahul gandhi maharashtra bhiwandi court ordered आरएसएसचे नेते राजेश कुंटेंनी राहुल गांधींना पाठवली 1500 रुपयांची मनीऑर्डर, जाणून घ्या काय आहे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/30/07fa10758ff965ac482d0537515066ad_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)नेते राजेश कुंटे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना 1500 रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. भिवंडी न्यायालयाने राहुल गांधी यांना ही रक्कम देण्याचे आदेश दिला होता. त्यानंतर कुंटे यांनी राहुल गांधींना 1500 रुपयांची मनीऑर्डर पाठवली.
राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली आहे. "न्यायालयाच्या निर्देशानुसार कुंटे यांनी मनीऑर्डरद्वारे पाठवलेले 1500 रुपये राहुल गांधी यांच्या दिल्लीतील कार्यालयात मिळाले आहेत." असे नारायण यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) जेव्ही पालीवाल यांनी तक्रारदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांना राहुल गांधी यांना 1500 रुपये देण्याचे आदेश दिले होते. सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केल्यामुळे कुंटे यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे.
कुंटे यांनी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात दोन वेळा सुनावणी स्थगीत करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. कुंटे यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे याच प्रकरणी कुंटे यांना मार्च महिन्याचे 500 रूपये आणि एप्रिल महिन्याचे एक हजार रूपये राहुल गांधी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
2014 मध्यील भिवंडीतील राहुल गांधींच्या भाषणानंतर राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी भिवंडीतील सभेत केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा कुंटे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, कॉंग्रेस नेते राहुल गांधी 28 एप्रिलनंतर मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता
Devendra Fadnavis : राहुल गांधी देखील आता मंदिरात जाऊ लागले आहेत : देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी यांच्या नावावर संपत्ती करणारी वृद्ध महिला कोण? त्यांच्या मालमत्तेत काय काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)