एक्स्प्लोर

राहुल गांधी यांच्या नावावर संपत्ती करणारी वृद्ध महिला कोण? त्यांच्या मालमत्तेत काय काय? 

देहरादूनमध्ये राहणाऱ्या पुष्पा मुंजियाल यांनी आपला वारस म्हणून राहुल गांधी यांची घोषणा करत संपूर्ण संपत्ती त्यांच्या नावावर केली आहे.

देहरादून : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमधून एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका वृद्ध महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधल्या नेहरु कॉलनी डालनवालामध्ये राहणाऱ्या पुष्पा मुंजियाल यांनी आपला वारस म्हणून राहुल गांधी यांची घोषणा करत संपूर्ण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. या संपत्तीमध्ये 50 लाख रुपयांची एफडी आणि 10 तोळं सोन्याचा समावेश आहे.

याआधी दून रुग्णालयालाही मदत
अशाप्रकारे दान करण्याची पुष्पा मुंजियाल यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2011 मध्ये त्यांनी दून या सरकारी रुग्णालयाला 25 लाख रुपयांचं दान दिलं होतं. हे पैसे गरिबांच्या इलाज, औषधांसह रुग्णालयातील मशिनच्या देखरेखीसाठी खर्च करण्यासाठी दिले होते.  

'संपत्तीचा मालकी हक्क राहुल गांधी यांना सोपवावा'
पुष्पा मुंजियाल यांनी आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करत ते मृत्युपत्र देहरादून कोर्टातही सादर केलं आहे. त्यांनी कोर्टात आपल्या संपत्तीचं विवरण देताना म्हटलं की, माझ्यानंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी. 79 वर्षीय पुष्पा मुंजियाल यांच्या मालमत्तेत 50 लाखांची एफडी आणि 10 तोळे सोन्याचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होत पुष्पा यांनी त्यांना या संपत्तीचा वारस बनवलं आहे.

राहुल गांधी यांच्या विचारांचा प्रभाव 
संपत्ती दान करणाऱ्या महिलेचं नाव पुष्पा मुन्जियाल आहे, त्यांचं वय 79 वर्षे आहे. माझ्यावर राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. मग ते इंदिरा गांधी असोत की राजीव गांधी. या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

दुर्घटनेत पुष्पा मुंजियाल यांनी दृष्टी गमावली
पुष्पा मुंजियाल या अंध आहेत, पण त्यांचे विचार थोर आहेत. पुष्पा प्रेम धाम नावाच्या वृद्धाश्रमात त्या राहतात. आपल्याला दिसू शकत नाही म्हणून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर ओझं बनायचं नव्हतं. त्यामुळे त्या वृद्धाश्रमात राहतात. पुष्पा मुंजियाल या शाळेत शिक्षिका होत्या. आपल्या निवृत्तीच्या दोन वर्ष आधी त्यांनी व्हीआरएस घेतली होती. पण 1998 मध्ये एका दुर्घटनेत त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर त्या काही काळ आपल्या बहिणींसोबत राहत होत्या. परंतु आपण आपल्या नातेवाईकांवर ओझं बनत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. यामुळे त्यांनी देहरादूनच्या डालनवालामधील प्रेम धाम वृद्धश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?

व्हिडीओ

Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
कट रचून माझं गर्भाशय काढलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
कट रचून माझं गर्भाशय काढलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
Nagpur Crime : घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणांचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!
घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणाचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!
Relatinship Tips : 'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय
'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय
Embed widget