एक्स्प्लोर
Advertisement
Sonia Gandhi | सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर कायम राहणार!
सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर कायम राहणार आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
नवी दिल्ली : सात तासानंतर अखेर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपली असून सोनिया गांधी तूर्तास हंगामी अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. पुढच्या 6 महिन्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सोनिया गांधींना मदतीसाठी 4 सदस्य कमिटी बनवणार असून जी दैनंदिन कामकाजात मदत करणार आहे.
सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झाल्याने नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु झाली होती. अशातचं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे अधिकचं गुंता निर्माण झाला होता. मात्र, अखेर सोनिया गांधी यांचीच 6 महिन्यांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.
बैठकीतले महत्वाचे मुद्दे
- पत्राचा विषय माझ्यासाठी संपला, ज्यांनी हे पत्र लिहिले, त्यांच्याबद्दल मनात काहीही नाही, सोनिया गांधी यांचे बैठकीत वक्तव्य.
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन पुढच्या दोन ते तीन महिन्यात बोलावलं जाणार, ज्यात अध्यक्षपदाची निवड होऊ शकते.
- अध्यक्षपदाच्या निवडीला एक कालमर्यादा असावी हा मुद्दा राहुल गांधी यांनी बैठकीत सुचवला.
- पत्र लिहिणार्या पैकी एक जितीन प्रसाद यांनी बैठकीत माफी मागितली. आपण गांधी कुटुंबा सोबतच आहोत असं सांगितलं.
- या सर्व सीनियर लोकांसोबत मी काम केलं आहे, त्यांनी अशी पत्र पाठवणं हे दुर्दैवी, कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं बैठकीत मत.
- बैठकीदरम्यान मीडियामध्ये मिनिटामिनिटाला जे तपशील बाहेर येत होते, त्याबद्दलही बैठकीमध्ये चर्चा. अहमद पटेल यांनी नेत्यांची नावे घेऊन त्यांना तंबी दिली.
- या पत्राचा ड्राफ्ट तुमच्या शिवाय कोणी बनवू शकत नाही, असं बैठकीत अहमद पटेल आनंद शर्मा यांना म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement