एक्स्प्लोर
नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन संसदेत रणकंदन होण्याची शक्यता
नवी दिल्ली : नवा आठवडा, नव्या रांगा आणि नवे रणकंदन... रविवारच्या विश्रांतीनंतर देश पुन्हा एकदा रांगेत उभा आहे. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज रांगांची लांबी रोडावल्याचं चित्र आहे. त्यामुळे नोटाबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती आता निवळण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे देशात अशी स्थिती असताना राजधानी दिल्लीत मात्र विरोधकांनी नोटबंदीवरुन सरकारला घेरण्याचा मनसुबा कायम ठेवलेला दिसत आहे. दिल्लीत विरोधकांनी एकजूट दाखवण्यासाठी एक बैठक घेतली आहे. त्यामुऴे संसद सुरु होताच विरोधक या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अडून बसण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात या प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. पण लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब होत राहिली. त्यामुळे देशभरात वातावरण निवळत असताना संसदेत मात्र रणकंदन माजण्याची शक्यता आहे.
काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement