National Emblem Controversy : "नव्या अशोक स्तंभात कोणताही बदल केलेला नाही, पण..." विरोधकांच्या विरोधानंतर शिल्पकार सुनील देवरेंची प्रतिक्रिया
National Emblem Controversy : संसद भवनाच्या इमारतीत उभारलेल्या अशोकस्तंभावरून विरोधकांकडून झालेल्या विरोधानंतर राष्ट्रचिन्ह बनवणाऱ्या शिल्पकाराची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
National Emblem Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 11 जुलै रोजी नवीन संसदेच्या इमारतीवरील राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे (National Emblem Ashok Stambh) अनावरण करण्यात आले. मात्र, या अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून (Ashok Stambh) वाद निर्माण झाला. अशोक स्तंभावरून वाद सुरू असतानाच त्याची रचना करणारे शिल्पकार सुनील देवरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नव्या अशोक स्तंभाचे अनावरण होताच वादाला तोंड फुटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसद भवनाच्या इमारतीत नव्या अशोक स्तंभाचे अनावरण होताच वादाला तोंड फुटले. राष्ट्रचिन्हाशी छेडछाड करून त्यात बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यात बांधलेले सिंह सारनाथमध्ये असलेल्या स्तंभापेक्षा वेगळे आहेत. असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारवर अशोक स्तंभाबाबत टीकेची झोड उठत असताना दुसरीकडे सरकारचीही बाजू काही नेटिझन्सने मांडली आहे. अशोक स्तंभावरील फोटो फारच जवळून घेण्यात आल्याने तो आक्रमक वाटत असावा असे म्हटले आहे. नवीन संसदेच्या इमारतीवर असलेला अशोक स्तंभ 20 फूट उंच असून 9500 किलो वजनाचा आहे. हे अशोक स्तंभ तांब्याचे आहे.
शिल्पकार सुनील देवरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर
नव्या अशोक स्तंभावरून वाद सुरू असतानाच त्याची रचना करणारे शिल्पकार सुनील देवरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिल्पकार सुनील देवरे म्हणाले, "त्यांनी बनवलेली मूर्ती आणि मूळ रचना यात काही किरकोळ फरक असू शकतो. नवी मुर्ती 9.5 टन वजनाची ब्राँझची बनविण्यात आली आहे. तसेच ते म्हणाले की, राष्ट्रीय प्रतिक नव्या अशोकस्तंभाच्या चारित्र्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुनील देवरे म्हणाले, 'मूळ राष्ट्रीय चिन्ह 7 फूट उंच आहे, तर नवीन प्रतीक सुमारे 7 मीटर (सुमारे 21 फूट) उंच आहे. ते म्हणतात की, 'व्हायरल होत असलेल्या राष्ट्रचिन्हाच्या चिन्हाचे फोटो मूर्तीच्या खालच्या कोनातून घेण्यात आले आहे आणि विविध अॅंगलने पाहिल्यास त्याचे स्वरूप बदललेले दिसते.'
नीट अभ्यास करून राष्ट्रचिन्ह बनवले
शिल्पकार सुनील देवरे यांनी दावा केला की, 'मी नीट अभ्यास करून राष्ट्रचिन्ह बनवले आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या वतीने मला प्रतीक बनवण्याचे काम देण्यात आले होते आणि मला सरकारकडून याबाबत कोणतीही सूचना मिळाली नाही.'
राष्ट्रीय चिन्हाशी छेडछाड केल्याचा आरोप
संसदेच्या नवीन इमारतीत लावण्यात आलेल्या राष्ट्रीय चिन्हाचा वाद वाढत चालला आहे. याप्रकरणी विरोधक सातत्याने सरकार आणि पंतप्रधानांबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर राष्ट्रीय चिन्हाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच या आरोपांमागे अनेक कायदेशीर आणि ऐतिहासिक युक्तिवादही देण्यात आले आहेत. दुसरीकडे, भाजपने विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले असून सरकारने राष्ट्रचिन्हात कोणताही बदल केलेला नाही, असे प्रतिक्रियेत म्हटले आहे.
कोण आहेत सुनील देवरे?
राष्ट्रचिन्ह बनवणारे सुनील देवरे 49 वर्षांचे आहेत. जेजे जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांना शिल्पकलेमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. सुनील देवरे यांनी यापूर्वी अजिंठा एलोरा व्हिजिटर सेंटर येथे अजिंठा एलोरा लेण्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. ज्याची किंमत 125 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या