एक्स्प्लोर
माता न तूं वैरिणी, महिलेने पोटच्या 3 वर्षांच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेकलं!
नवी दिल्ली : सासू-सासऱ्यांशी भांडण झाल्याच्या रागात महिलेने पोटच्या तीन वर्षाच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेकून दिलं. देशाची राजधानी दिल्लीच्या प्रहलादपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
सोनू गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. एका आईच्या कौर्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने जगासमोर आली.
सोनू गुप्ताचं लग्नानंतर कायम पती आणि सासू सासऱ्यांशी भांडण होत असे. अनेकवेळा घरगुती भांडण पोलिस ठाण्यापर्यंतही गेलं होतं. सोनू गुप्ताची कोणत्या तरी कारणावरुन सासू सासऱ्यांसोबत वाद सुरु होते. हळूहळू भांडण वाढत गेलं. रागाच्या भरात तिने शेजारी असलेले कपडे आणि त्यानंतर तीन वर्षांच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेकलं.
सुदैवाने तीन वर्षांच्या मुलाला जास्त दुखापत झालेली नाही. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपी आई सोनू गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अद्याप अटक झालेली नाही. सोनू गुप्ताला शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement