एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील
दिल्लीतील सीजीओ संकुलात असलेलं CRPF मुख्यालय सील करण्यात आलं आहे. संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्याशिवाय ही इमारत सुरु केली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे.
नवी दिल्ली : दिल्लीमधील केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बलाचे (CRPF) मुख्यालय बंद करण्यात आलं आहे. सीआरपीएफ हेडक्वार्टरमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्यामुळं मुख्यालय सील करण्यात आलं असल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. तसेच 40 वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं असल्याची देखील माहिती आहे. एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रविवारी तातडीनं कार्यालय सील करण्यात आलं. दरम्यान, कोरोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.
भारतातील सर्वात मोठं निमलष्करी दल सीआरपीएफच्या विशेष महासंचालक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधित एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागणं झाल्याचं समोर आलं. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं सीआरपीएफचं कार्यालय सील करण्याची कार्यवाही हाती घेतली. आता संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्याशिवाय ही इमारत सुरु केली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे. सीआरपीएफच्या जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्यांना वैद्यकीय नियमावलीनुसार प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. कोरोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत सीआरपीएफचे 136 आणि बीएसएफचे 17 जवान कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागणTotal 40 officers and staff including a Special Director General rank officer, Deputy Inspector General to be home quarantined.#COVID19 #CRPF https://t.co/HB8gGCDsPS
— ANI (@ANI) May 3, 2020
दाटीवाटीनं घरं असलेल्या भागात योग्य काळजी घेतली नाही तर कोरोनाचा कसा भडका उडू शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण दिल्लीत काल पाहायला मिळालं. दिल्लीतल्या कापसहेडा परिसरात एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतल्या दक्षिण पश्चिम दिल्ली परिसरातल्या कापसहेडामध्ये ज्या ठिकाणी मजूर, व इतर कामगार दाटीवाटीनं राहतात तिथं 18 एप्रिलला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यानंतर प्रशासनानं या परिसरातल्या लोकांची चाचणी केल्यानंतर 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उजेडात आलाय. कापसहेडा हा हरियाणाला लागून असलेला भाग आहे. या परिसरात काम करणारे अनेक गरीब मजूर या ठिकाणी दाटीवाटीनं राहतात. कापसहेडाच्या ठेकेवाली गलीत जवळपास 175 खोल्या आहेत. इथे 18 एप्रिलला एक कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर प्रशासनानं तातडीनं ही गल्ली सील केली होती. एरव्ही एका परिसरात 3 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त सापडल्यावर इमारत पूर्णपणे सील होते. पण कापसहेडामध्ये अगदी चिंचोळ्या भागात एकाला एक लागून खोल्या आहेत. जवळपास सव्वा लाख मजूर या ठिकाणी राहतात. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं एक रुग्ण सापडल्यावरच इथली संपूर्ण गली सील केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement