Crime News: मुलींसाठी 500, कपलसाठी 800, मुलांसाठी 1000...त्या फ्लॅटमधून येत होते विचित्र आवाज, पोलिसांनी फ्लॅटचं दार उघडलं अन् झाले थक्क
Crime News: नोएडातील उच्चभ्रू समजल्या सोसायटी असलेल्या सेक्टर 94 मधील सुपरनोवा सोसायटीमधील एका फ्लॅटवर पोलिसांनी दार ठोठावले तेव्हा आतमध्ये सुरू असलेला प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी येथून 20 हून अधिक मुला-मुलींना अटक केली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Crime News: नोएडाच्या सेक्टर 94 मध्ये शुक्रवारी रात्री अचानक गोंधळ सुरू झाला, पोलिसांच्या हालचाली वाढल्या. येथील पॉश एरियातील सुपरनोव्हा सोसायटीतील एका फ्लॅटचे पोलिसांनी (Police) दार ठोठावले, तेव्हा आतील दृश्य पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. पोलिसांनी त्या ठिकाणावरून 20 हून अधिक मुला-मुलींना अटक केली आहे.
सुपरनोव्हा सोसायटीतील लोकांनी पोलिसांना (Police) फोन करून विचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली. लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर आश्चर्यचकित झाले. फ्लॅटमध्ये हे मुलं- मुली बिनदिक्कतपणे दारू पीत होते. तेथून दारुच्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या होत्या. यापैकी बरेच जण हे 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.
नेमकं काय घडलं?
चौकशी केली असता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री येथे रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचे समोर आले. या वेळी तिथे खूप मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. या आवाजाने त्रासलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना (Police) फोन करून तक्रार केली. लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर त्यांनाही धक्का बसला. फ्लॅटमध्ये हे विद्यार्थी बिनदिक्कतपणे दारू पीत होते. तेथे दारुच्या बाटल्या सर्वत्र पसरल्या होत्या. यापैकी बरेच लोक 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, जे यूपीमध्ये दारू पिण्यासाठी किमान स्वीकार्य वय आहे.
सुपरनोव्हा सोसायटीत राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी या मुलांना थांबवले तेव्हा त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने बाल्कनीतून दारूच्या बाटल्याही खाली फेकल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीची निमंत्रणे व्हॉट्सॲपवरून पाठवण्यात आली होती. निमंत्रणाच्या मेसेजमध्ये लिहिले होते, 'एक घरगुती पार्टी होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता आमच्या घरी या आणि आयुष्यभरासाठीच्या आठवणी एकत्रित जमवूयात.'' मुलींसाठी प्रवेश शुल्क 500 रुपये, जोडप्यांसाठी 800 रुपये आणि मुलांसाठी 1000 रुपये असल्याचेही निमंत्रण पत्रिकेत सांगण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.