एक्स्प्लोर

COVISHIELD Prices Controversy : 'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरमचं स्पष्टीकरण

कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसींचा सध्या मोठा आधार आहे. भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोविशिल्ड या लसीच्या किंमतीवरून सध्या चर्चा रंगतेय. या लसीची किंमत इंग्लंड, युरोपमधील लसींहून अधिक आहे, यावर अनेकांनी आक्षेप घेतला. या प्रकरणावर सीरमने आज स्पष्टीकरण दिलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे दर युरोप-इंग्लंडपेक्षा अधिक का? कोविड संकटात नफा कमावणे योग्य आहे का?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जी देशात सर्वाधिक वापरली जाणारी Covishield ही कोविडची लस बनवते यांनी सुरुवातीच्या दराच्या दीड पट दराने लसीची किंमत वाढवलीय. कोविशिल्ड लसीचा केवळ काही प्रमाणात साठा हा 600 रुपयांनी विकला जाणार आहे. सीरमने आज किंमतीबाबत दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, या लसीची किंमत अद्याप इतर वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या लसींपेक्षा कमीच आहे. कोविडच्या उपचारांसाठी लागणारी महत्वाची उपकरणं आणि इतर जीवघेण्या रोगांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींपेक्षा कोविशिल्डची किंमत कमी आहे, अशी बाजू सीरमने मांडली.

सीरमने दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी पुढे म्हटलंय, "सध्याची कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोना व्हायरस हा सतत म्युटेट होताना दिसतोय, त्यामुळे रुग्णांची वाढती संख्याही भीषण आहे. या रोगाची अनिश्चितता ओळखून तुमची सक्षमता वाढवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यासाठी गुंतवणुकीचीही तितकीच गरज आहे, जेणेकरून सीरम इन्स्टिट्युट लसींचं उत्पादन आणखी मोठ्या संख्येने करण्यास सक्षम होईल."

पुण्यात तयार होत असूनही सीरमची लस महाराष्ट्राला 24 मेपर्यंत मिळणार नाही, परदेशी लसींबाबत चाचपणी सुरू

कोविशिल्डच्या किंमतीवर अनेकांनी बोट उगारलं असताना सीरमने त्यावर म्हटलंय की, सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीच्या किंमतीची तुलना जागतिक लसींच्या किंमतीशी केली जातेय. कोविशिल्ड ही लस सध्या बाजारात उपलब्ध असलेली सर्वांना परवडणारी अशी लस आहे. सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, कारण काही देशांनी तातडीच्या उत्पादनासाठी आगाऊ निधी दिला होता, त्यानुसार ही किंमत ठेवली गेली. भारतातील लसीकरण मोहिमेसाठी सुरुवातीला जो पुरवठा केला गेला तेव्हादेखील या लसीची किंमत कमी असल्याचं स्पष्टीकरण सीरम इन्स्टिट्युटने दिलं.

New COVID Vaccine : Serum आणि Novavax कंपन्यांनी तयार केली नवी लस, नव्या लसीच्या चाचण्या सुरू

संबंधित बातम्या

Covovax | सीरम इन्स्टिट्यूट आणि  Novavax यांच्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात

Corona Vaccination | महाराष्ट्रातील व्यापक लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदर पुनावाला यांच्यात चर्चा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Speech On Akshay Shinde : अक्षय शिंदेंच बनावट एन्काऊंटर, मग पोलिस गुन्हा दाखल का करत नाही?ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 25 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAjit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषणDyaneshwari Munde : CDR काढा...आम्हाला न्याय द्या! महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा
Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
Iran Girl Arrest : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, दोन तरुणींना बेड्या, आता किती फटके खाण्याची शिक्षा होणार?
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Jandhan Yojana: जनधन योजनेतील 11 कोटी बँक खाती निष्क्रिय, सातत्यानं संख्येत वाढ सुरुच, सर्वाधिक खाती कोणत्या बँकेत?
जनधन योजनेच्या निष्क्रिय खात्यांच्या संख्येत वाढ सुरुच, डिसेंबर 2024 पर्यंत संख्या 11 कोटींवर, आकडेवारी समोर
Embed widget