(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covovax | सीरम इन्स्टिट्यूट आणि Novavax यांच्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात
Covovax या पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि Novavax यांच्या भागिदारीतून तयार होत असलेल्या कोरोना लसीच्या (corona vaccine)चाचणीला भारतात सुरुवात झाली आहे. ती ब्रिटन आणि आफ्रिकेतील कोरोना व्हेरिएन्टविरोधात 89 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात झाली आहे. ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिेएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी दिली आहे.
Covovax trials finally begin in India; the vaccine is made through a partnership with @Novavax and @SerumInstIndia. It has been tested against African and UK variants of #COVID19 and has an overall efficacy of 89%. Hope to launch by September 2021! https://t.co/GyV6AQZWdV
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) March 27, 2021
जानेवारी महिन्यात Novavax या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील 245 कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती. हे सर्व रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्याना या लसीचा डोस देण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की ही लस 48.6 टक्के प्रभावी आहे. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील 18 ते 84 वयाच्या 15,000 कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यामध्ये 27 टक्के रुग्ण हे 65 वर्षावरील होते. त्यावेळी आलेल्या परिणामातून असं लक्षात आलं की, कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस 96.4 टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती 86.3 टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलंय.
भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भारताने आता देशांतर्गत कोरोना लसीचा तुटवडा जाणवू नये म्हणून आपल्या शेजारील राष्ट्रांना आणि आफ्रिकेतील, युरोपातील देशांना करण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या निर्यातीवर काही कालावधीसाठी बंदी आणली आहे. अशातच आता सीरम इन्स्टिट्यूट आणि नोव्हावॅक्स यांच्या भागिदारीतून निर्माण करण्यात येणाऱ्या कोवाव्हॅक्स या लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. ही लस येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येणार असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या :
- कृती सेननच्या फोटोवर बिग बींची कमेंट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- PM Modi on Bangladesh Visit | पंतप्रधान मोदींची बांगलादेशमधील जशोरेश्वरी काली मंदिरात पूजा
- ISRO | इस्त्रोच्या आगामी सर्व मिशनमध्ये हरित इंधनाचा वापर होणार : के. सिवन