Covid-19 Cases LIVE : पुन्हा कोरोनाचं टेन्शन! जगात कोरोनाचा उद्रेक; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Coronavirus LIVE Updates : जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर वाढताना दिसत आहे. यामुळे भारत सरकारही अलर्टवर आहे. कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या.

Background
Coronavirus Updates : जगभरात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्यो पुन्हा एकदा कोरोना विस्फोट झाला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये मोठ्या कोरोना रुग्ण आढळत असून अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामागोमाग जपान आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.
जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर
जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, प्रशासन अलर्टवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले. याआधी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या नवीन प्रकारांचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमितांमध्ये आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले होते.
चीनमध्ये कोविड रुग्णांची (Covid) संख्या अचानक वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात (India) उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक (Mask Compulsory) करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सांगितलंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या
"बैठकी दरम्यान होणार महत्वाचे निर्णय"
आज होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे, तसेच या बैठकी दरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर असून पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. काय म्हणाल्या भारती पवार?
कोरोना विषाणूंमुळे (Coronavirus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह (China), अमेरिका (America), ब्राझील (Brazil) आणि जपानमध्येही (Japan) कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अशात भारतामध्ये मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती सामान्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदर पूनावाला
जगभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.
कोविड आढाव्या संदर्भातली राज्य सरकारची बैठक संपली
कोविड आढाव्या संदर्भातली राज्य सरकारची बैठक संपली. राज्यातील कोविड स्थितीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेतला. कोविड संदर्भातील टास्क फोर्स पुनर्गठीत करणार असल्याचं या बैठकीत ठरलं आहे. राज्यातील तज्ञ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची टास्क फोर्स असेल. थोड्याच वेळात याबद्दल आरोग्यमंत्री विधानसभेत देखील निवेदन करणार आहेत. जागतिक आणि राज्यातील स्थितीचा आणि सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात
ओमायक्रॉनच्या नव्या सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरु झाली आहे. देशभरात मास्कसक्ती लागण्याची शक्यता आहे.























