Coronavirus Cases In India : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट, 24 तासांत 7533 नवे कोरोना रुग्ण
Coronavirus Cases In India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची आकडेवारी जाहीर केली असून गेल्या चोवीस तासांत 7533 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases In India: देशात (Covid) गेल्या चोवीस तासात कोरोनाचे (Coronavirus) 7,533 नवे रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 4.49 कोटी झाली आहे. तसेच देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत 53,852 इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (28 एप्रिल) सकाळी आठ वाजता कोरोनाची आकडेवारी जाहीर केली. गेल्या चोवास तासांत 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,31,468 इतकी झाली आहे.
मृत्यूदर कमी असल्याने चिंतेचे कारण नाही
देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरीही कोरोनाचा मृत्यूदर मात्र कमी असल्याने काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के इतके आहे. आजच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 53,852 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा दर हा 0.12 टक्के इतका आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं चित्रही सध्या पाहायला मिळत आहे. कमी मृत्यूदर असल्याने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणतही वाढ होताना दिसत आहे.
रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण जास्त
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 09.69 टक्के असल्याने काळजीचे कारण्याचे कोणतेही कारण नाही आहे. या आकडेवारीनुसार देशांत आतापर्यंत 4,43,47,024 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशांत लसीकरणाला देखील चांगला प्रतिसाद मिळात आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत कोविड-19 चे लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 22 कोटी इतकी आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम संपूर्ण देशभरात खूप मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे.
2020 साली सुरु झालेल्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगभरात हा:हाकार माजवला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी ही रुग्णसंख्या पहिल्यांदा एक कोटीपेक्षा अधिक झाली होती. त्यांनंतर देखील या रुग्णसंख्येचा आलेख वाढतच गेला. गेल्या वर्षी 25 जानेवारी रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही चार कोटींच्या आसपास होती. परंतु आता कोरोनाच्या साथीचे प्रमाण आटोक्यात आले असून यावर आरोग्य विभागाकडून उपाययोजना देखील केल्या जात आहेत. कोरोनामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नसले तरीही काळजी घेण्याची गरज असल्याचंही आरोग्य विभाकडून सांगण्यात येत आहे. तसेच जास्त गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )