Adenovirus Infection : आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या 'या' भागांनाही पोहोचवतो नुकसान...
Adenovirus Infection : लहान मुलांमध्ये एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत याचा फैलाव जलद गतीने होऊ शकतो. हा व्हायरस यकृत आणि किडनी खराब करते.
Adenovirus Infection : एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत त्याचा आणखी फैलाव होऊ शकतो. पश्चिम बंगालनंतर आता बंगळुरुमध्येही लहान मुलांना या व्हायरसची लागण झाली आहे. एडिनोव्हायरसमुळे बंगळुरुमधील दोन वर्षांच्या मुलीचे यकृत आणि किडनी खराब झाली आहे. या व्हायरसच्या संसर्गावेळीच दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि बंगळुरुमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बाल वॉर्डात श्वासोच्छवासाचा त्रास होत असलेल्या बालकांना दाखल केले जात आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एडिनोव्हायरसने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे श्वासोच्छवासाचा त्रास. हा विषाणू मुख्यतः 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील मुलांचा बळी घेतो. एडिनोव्हायरस (Adenovirus) दिवसेंदिवस आणखी धोकादायक होत आहे, या विषाणूमुळे मुलांचे यकृत-किडनी खराब होत आहेत.
एडिनोव्हायरस हा काय प्रकार आहे?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, एडिनोव्हायरस हा एक प्रकारचा विषाणू आहे जो तुमच्या शरीराला हळूहळू आजारी बनवतो आणि नंतर हा संसर्ग शरीरात धोकादायक रुप धारण करतो. एडिनोव्हायरसने ग्रस्त असलेल्या मुलांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो.
एडिनोव्हायरसची लक्षणे
एडिनोव्हायरसची लक्षणे खूप सामान्य आहेत, जे इतर व्हायरल इन्फेक्शनच्या तुलनेत सौम्य असतात. एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. थकवा, भूक न लागणे ही काही एडिनोव्हायरसची लक्षणे आहेत. लक्षण जाणवत असलेल्या मुलांची चाचणी केल्यानंतरच त्यांना एडिनोव्हायरस झाला आहे हे कळते. या व्हायरसचा फैलाव सहसा हिवाळ्याच्या सुरुवातीला सुरु होतो आणि वसंत ऋतूमध्ये तो शिगेला पोहोचतो, पण यंदा उन्हाळ्यातही एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही.
एडिनोव्हायरसचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?
एडिनोव्हायरस मुख्यत: लहान मुलांना किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्तीलाही होऊ शकतो. पण 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये याचा संसर्ग खूप सामान्य आहे. एडिनोव्हायरस बऱ्याचदा नवजात बाळ आणि लहान मुलांमध्ये पसरु शकतो. हा विषाणू एका मुलाकडून दुसऱ्या मुलांमध्येही पसरतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, हा विषाणू मुलांनी तोंडात वस्तू टाकल्यानेही पसरतो.
एडिनोव्हायरसशी लढण्यासाठी लावल्या गेल्या ईसीएमओ मशिन्स
एडिनोव्हायरसच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, कोविड-19 च्या उपचारात ईसीएमओ मशीन वापरण्यात आल्या होत्या. श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णावंर उपचार करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरते. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, या वर्षाच्या सुरुवातीला एडिनोव्हायरसची लागण झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांसाठी ECMO (एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) हे मशीन जीवनरक्षक ठरले आहे.
जानेवारी ते एप्रिलदरम्यान एडिनोव्हायरसच्या तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. तिघांचीही एडिनोव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ECMO मशिनवर ठेवण्यात आले होते. यातील पाच वर्षांचा मुलगा 18 दिवस ECMO वर होता. 15 वर्षांची मुलगी 47 दिवस ECMO मशिनवर होती, तर चार वर्षांचा मुलगा आठ दिवस मशिनवर होता. दीर्घ उपचारानंतर ही मुले बरी झाली.
संबंधित बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )