Bharat Biotech म्हणतेय, कोव्हॅक्सिन आता यूनिव्हर्सल लस, आम्ही आमचे टार्गेट पूर्ण केलं
Bharat Biotech on Covaxin : कोवॅक्सिन लस ही आता प्रौढांसाठी आणि मुलांसाठी यूनिव्हर्सल लस बनली आहे, अशी माहिती दिली भारत बायोटेकने दिली आहे.
Bharat Biotech on Covaxin : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण सुरु आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु असतानाच भारत बायोटेक कंपनीने आपल्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोवॅक्सिन (COVAXIN) लस ही आता प्रौढांसाठी आणि मुलांसाठी यूनिव्हर्सल लस (Universal Vaccine) बनली आहे, अशी माहिती दिली भारत बायोटेकने दिली आहे. ही लस यूनिव्हर्सल झाले, आम्ही आमचे टार्गेट पूर्ण केलं आहे, असेही भारत बायोटेक यांनी म्हटलेय.
भारत बायोटेक कंपनीकडून एक निवेदन जारी करत कोवॅक्सिन लसींबाबत माहिती दिली आहे. ही लस आता प्रौढ आणि मुलांसाठी यूनिव्हर्सल लस (Universal Vaccine) बनली आहे. लसीच्या माध्यमातून कोरोनाच्या (Corona) विरोधात जागतिक लस विकसित करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तसेच परवान्यासाठी सर्व उत्पादनांचा विकास पूर्ण झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
COVAXIN is now a universal vaccine for adults and children. Our goals of developing a global vaccine against COVID-19 have been achieved and all product development for licensure has been completed: Bharat Biotech pic.twitter.com/LQ7iBxp5OI
— ANI (@ANI) January 13, 2022
दरम्यान, कोरोना महामारीविरोधात सुरु असलेल्या लढ्याला दहा जानेवारी रोजी नवीन सुरुवात झाली आहे. दहा जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि 60 वर्षांवरील नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात येत आहे. तसेच तीन जानेवारीपासून 15 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आता भारत बायोटेकने आपली लस यूनिव्हर्सल झाल्याचे सांगितले आहे.
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस Omicron आणि Delta वर प्रभावी, Bharat Biotech चा दावा
डेल्टा व्हेरियंटने गेल्यावर्षी धुमाकूळ घातला होता. आता ओमायक्रॉन (B.1.529) व्हेरियंटने हाहाकार माजवला आहे. डेल्टा (B.1.617.2) आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग दर जास्त आहे, तर डेल्टा व्हेरियंटचा मृत्यूदर अधिक आहे. या कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणालाही वेग आला आहे. कोरोनाशी जगभरात लढा दिला जात असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिन (BBV152) लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटला निष्क्रीय करु शकतो, असे चाचण्यांमधून दिसून आल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीने केला आहे. एका लाइव्ह वायरस न्यूट्रलायजेशनद्वारे कोव्हॅक्सिन लसीच्या बोस्टर डोसवर अभ्यास करण्यात आला. यामध्ये ही लस डेल्टा आणि ओमायक्रॉनविरोधात न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी तयार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोव्हॅक्सिन लसीचा बूस्टर डोस डेल्टा विरोधात 100 टक्के तर ओमायक्रॉनविरोधात 90 टक्के प्रभावी असल्याचे सीरम चाचणीत स्पष्ट झाले आहे. एमोरी यूनिवर्सिटीमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार, कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोस घेतलेल्यांना सहा महिन्यानंतर बूस्टर डोस दिला. बूस्टर डोस घेतल्यानंतर ओमायक्रॉन आणि डेल्टा लसीला न्यूट्रलाइज करण्यात आल्याचं समोर आलं आहे.