महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ ; वर्षा बंगल्यावरून के. चंद्रशेखर राव यांचा भाजपवर निशाणा
सध्या देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, यावर आमच्यात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सहमती झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चेंद्रशेखर राव यांनी दिली आहे.
telangana cm K Chandrasekhar Rao : "देशातील राजकारण आणि विकास कामांच्या विविध मुद्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यावरून देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, यावर आमच्यात सहमती झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. याबरोबरच महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ असल्याचे के. चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीनंतर चेंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि नरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
चंद्रशेखर राव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवरच आम्ही चालत आहोत. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी सुरू गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू आहे. आजच्या भेटीचे पुढील काळात चांगले परिणाम दिसतील अशी आशा चंद्रशेखर रावा यांनी यावेळी व्यक्त केली.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, "भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत."
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. चंद्रशेखर राव
- Punjab Election: जोपर्यंत बाबा जिंकत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही... नवज्योत सिंह सिद्धूच्या मुलीने घेतली शपथ
- Goa Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण
- Punjab Elections 2022: मी चर्च, मंदिर-मशीदमध्येही जातो, जिवंत असेपर्यंत ख्रिश्चन धर्माकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही : सिद्धू