एक्स्प्लोर
गुजरात राज्यसभा निवडणूक : अटीतटीच्या लढतीत अहमद पटेल विजयी
गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांची मतं अखेर रद्द करण्यात आली आहे.

गांधीनगर : गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांचा अवघ्या अर्ध्या मतानं विजय झाला. काँग्रेसचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनेक घडामोडीनंतर मध्यरात्री 2.00 वाजता हा निकाल जाहीर झाला. अहमद पटेल यांना 43.50 मतं मिळाली आहेत. अहमद पटेल यांच्या या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला.
संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडल्यानंतर 5 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, दोन काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग करत आपली मतपत्रिका तिथं उपस्थित असलेल्या अमित शाह यांना दाखवली. त्यानंतर काँग्रेसनं यावर आक्षेप घेत मतमोजणी थांबवली आणि याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. दोन्ही बाजू ऐकून आणि तेथील सीसीटीव्ही फूटेज पाहून निवडणूक आयोगानं दोन आमदारांची मत तब्बल पाच तासानंतर रद्द ठरवली. त्यानंतर 12.15 वाजता मतमोजणी सुरु झाली. पण त्यानंतर भाजप पुन्हा एकदा मतमोजणी थांबवली. अखेर रात्री 1.40 वा. पुन्हा मतमोजणी सुरु झाली.
त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात निकाल समोर आला. ज्यामध्ये अहमद पटेल हे अवघ्या अर्ध्या मतानं विजयी झाल्याचं समोर आलं. त्याचवेळी अहमद पटेल यांनी ट्वीटरवरुन याबाबत माहिती दिली.
दरम्यान, या निवडणुकीत अमित शाह आणि स्मृती इराणी यांना 46-46 मतं मिळाली असून तेही विजयी झाले.
विजयानंतर अहमद पटेल यांची प्रतिक्रिया :
'हा फक्त माझा एकट्याचा विजय नाही. हा काँग्रेस पक्षाचा विजय आहे. मी आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका आणि 4 राज्यसभा निवडणुका लढवल्या. पण आतापर्यंतची एवढी टफ निवडणूक मी पाहिली नाही.' असं अहमद पटेल यावेळी म्हणाले.
LIVE: अवघ्या अर्ध्या मतानं अहमद पटेल विजयी, दोन मतं रद्द झाल्यानं पटेलांना फायदा (वेळ रात्री 2.06)
LIVE: स्मृती इराणी आणि अमित शाह यांना 46-46 मतं मिळाली (वेळ रात्री 2.05)
LIVE: अटीतटीच्या लढतीत अहमद पटेल विजयी, पटेलांना 44 मतं मिळाली. (वेळ रात्री 1.58)
LIVE: मी आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका आणि 4 राज्यसभा निवडणुका लढवल्या. पण आतापर्यंतची एवढी टफ निवडणूक मी पाहिली नाही. : अहमद पटेल (वेळ रात्री 1.58)
LIVE: हा फक्त माझा एकट्याचा विजय नाही. हा काँग्रेस पक्षाचा विजय आहे. : अहमद पटेल (वेळ रात्री 1.58)
LIVE : भाजपची कोणतीही तक्रार निवडणूक आयोगाकडे आलेली नाही. असं असल्यास मतमोजणी थांबली असल्यास ते असंवैधानिक आहे : निवडणूक आयोग सूत्र (वेळ रात्री 1.30)
LIVE : थोड्याच वेळात पुन्हा एकदा मतमोजणी सुरु होणार : एएनआय (वेळ रात्री 1.30)
LIVE : निवडणूक आयोगानं मतमोजणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मतमोजणी झाली पाहिजे. असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. (वेळ रात्री 1.30)
LIVE : भाजपची कोणतीही तक्रार निवडणूक आयोगाकडे आलेली नाही : सूत्र (वेळ रात्री 1.30)
LIVE : भाजपनं आक्षेप घेऊन मतमोजणी थांबवली : अर्जुन मोढवाडिया, काँग्रेस नेते (वेळ रात्री 12.50)
LIVE : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह अनेक बडे नेते मतमोजणी केंद्राबाहेर हजर (वेळ रात्री 12.44)
LIVE : गुजरात राज्यसभा निवडणूक : 45 मिनिटात निकाल हाती येण्याची शक्यता - वेळ रात्री 12 : 15
LIVE : गुजरात राज्यसभा निवडणूक : मतमोजणी सुरु - वेळ रात्री 12 : 15
गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपला मतदान करून मतपत्रिका अमित शहा यांना दाखवल्यानं ही दोन मतं अखेर रद्द करण्यात आली आहेत. निवडणुकीनंतर तब्बल सहा तासानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पटेलांचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्यानं प्रत्येक आमदाराचं मत हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. अशावेळी काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदानावेळी आपली मतदान पत्रिका ही तिथं उपस्थित असलेल्या अमित शाहा यांना दाखवली. आमदारांच्या या कृतीवर आक्षेप घेत काँग्रेसनं मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस हा वाद घेऊन निवडणूक आयोगाकडे गेले होते. दोन्ही बाजू ऐकून आणि त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज पाहून रात्री उशीरा निवडणूक आयोगाने निकाल देत दोन्ही मतं बाद ठरवली.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. मात्र, दरम्यान, नुकतीच मतमोजणी सुरु झाली आहे.
-----------------
काँग्रेसच्या मागणीनं मतमोजणीला ब्रेक
अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे अहमद पटेल बाजी मारणार की, भाजपची सरशी होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आक्षेपामुळे गेल्या पाच तासांपासून मतमोजणी थांबली आहे.
काँग्रेसच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असून दोन्ही आमदारांनी आपलं मतदान हे तिथं उपस्थित असलेल्या अमित शाह यांना दाखवल्याचा आरोप करत काँग्रेसनं ही मतमोजणी थांबवली. नियमानुसार जर कुठल्याही मतदारानं ठराविक पोलिंग एजंटशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपलं मतदान दाखवलं तर ते मत अवैध ठरतं. याचा फायदा घेऊन काँग्रेसनं ही मतं अवैध ठरवण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसनं घेतलेल्या या भूमिकेमुळे सध्या मतमोजणी थांबवण्यात आली आहे. यावेळी दोन्ही बाजूंकडील नेत्यांनी मतमोजणी केंद्रावर आपआपली बाजू मांडली. आता दोन्ही पक्ष हा वाद घेऊन निवडणूक आयोगाकडे गेले आहेत.
आज (मंगळवार) सकाळी राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या मतदानानंतर अहमदाबादमध्ये मतमोजणीला सुरुवातही करण्यात आली होती. पण काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपानंतर ही मतमोजणी थांबवण्यात आली.
भाजपकडे असलेल्या 122 जागांमुळे त्यांना तिसरी जागा जिंकण्यासाठी किमान 13 जागा कमी पडत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या खात्यात 44 जागा आहेत, आणि त्यांना राष्ट्रवादी आणि जेडीयूच्या मतांची अपेक्षा आहे. मात्र क्रॉस व्होटिंग आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे पटेलांची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या :
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने जुने हिशोब चुकते होत आहेत?
काँग्रेस जिंकणार नाही, त्यामुळेच पटेलांना मतदान नाही: वाघेला
जुनी खुन्नस, नवी खेळी; पटेल आणि शाह यांच्यातील नेमका वाद काय?
राज्यसभेच्या 9 जागांसाठी मतदान, गुजरातमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला


LIVE: अहमद पटेल यांचा विजय झाला आहे, निकालाबाबतची सगळी माहिती थोड्याच वेळात संपूर्ण माहिती मिळणार : अर्जुन मोढवाडिया, काँग्रेस नेते (वेळ रात्री 1.53) LIVE: अहमद पटेल यांचा विजय झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा (वेळ रात्री 1.51) LIVE: मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु (वेळ रात्री 1.43) LIVE : गुजरात राज्यसभा निवडणूक मतमोजणी पुन्हा एकदा सुरु (वेळ रात्री 1.40)This is not just my victory. It is a defeat of the most blatant use of money power,muscle power and abuse of state machinery
— Ahmed Patel (@ahmedpatel) August 8, 2017



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
नाशिक
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
