एक्स्प्लोर

भारतात कापसाचा दर वाढला, विक्रमी उच्चांक गाठल्याने धाग्यांसह कपडेही महागणार

भारतात सध्या कापसाचे भाव चढे असून हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये कापसाचा भाव तब्बल 12,500 रुपये प्रति क्विंटल वर पोहोचला आहे.

Cotton Price : देशभरात सतत वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असून किराणा मालासह सर्वच गोष्टी महाग होत आहेत. अशात आता जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दराने देखील उच्चांकी दरवाढ गाठली आहे. मागील दहा वर्षांचा विक्रम मोडल्याने याचा परिणाम भारतावरही झाला आहे. कापसाच्या भावाने भारतातही विक्रमी उच्चांक गाठला आहे. कापसातील तेजी आता थांबणार नसून ती यापुढेही कायम राहील, असा अंदाज कमोडिटी विश्लेषक व्यक्त करत आहेत. कापसाच्या दरातील वाढीमुळे धागे परिणामी कपडे सगळच महागणार आहे. 

यंदा जागतिक पातळीवर कापसाच्या भावात वाढ होण्याचं प्रमुख कारण कमी उत्पादन असल्याचं सांगितले जात आहे. कापूस सल्लागार समितीच्या अहवालानुसार, यावेळी जागतिक कापूस उत्पादन 26.4 दशलक्ष टन असेल, तर वापर 26.2 दशलक्ष टन असेल. त्याच वेळी, कोटलुकच्या मते, यावेळी जगभरात 25.5 दशलक्ष टन कापूस उत्पादन होईल. त्याच वेळी, एकूण वापर 25.7 दशलक्ष टन असेल. भारतातील कापसाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. एका कापसाच्या गाठीची 170 किलो किंमत 43,240 रुपये असा भारतात कापसाचा दर आहे. त्याचवेळी जागतिक स्तरावर कापसाचे भाव दहा वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. कापसाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक कापूस उत्पादनात घट आहे असं CNBC TV-18 च्या अहवाल म्हटलं आहे 

जगभराक कापूस महागला

भारतासह अमेरिका, इजिप्त या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये उत्पादन घटले आहे. भारतातही यंदा एकरी उत्पादन घटले आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये कापूस पिकाचे 70 टक्क्यांपर्यंत गुलाबी बोलार्डमुळे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्राझील सारखे देश सातत्याने कापूस खरेदी करत आहेत. चीनने मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी जास्त कापूस खरेदी केला आहे. आता चीनकडे असलेला साठा खूपच कमी झाल्याचे चिनी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी ते साठा करत आहे.

कपडे महागणार

भारतातील विविध राज्यात कापसाचे भाव वाढत आहेत. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये कापसाचा भाव तर तब्बल 12,500 रुपये प्रति क्विंटल वर पोहोचला आहे. त्याचवेळी महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यात कापसाचा दर 13 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कापसाचे दर वाढल्याने सूत तयार करणाऱ्या सूतगिरण्यांना ही कच्चा माल महागात मिळत असल्याने आता सुताच्या दरातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुताची किंमत वाढली म्हणजे सुती कपड्यांचे दरही वाढणार हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या :

INS Vikrant :  शत्रूलाही धडकी भरवणाऱ्या 'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेचे नेमकं काय झालं? जाणून घ्या

ED vs Shiv Sena : राज्यात ईडी विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटणार?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget