Corona Update : गेल्या 24 तासात देशात 2.57 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर, सक्रिय रुग्णसंख्येत घट
Coronavirus in India : देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत एक लाख चार हजार 525 ने घट झाली आहे. तरीही जगातील दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णसंख्येपैकी 40 टक्के रुग्ण एकट्या भारतात वाढत आहेत.
नवी दिल्ली : भारतातील कोरोनाची दुसरी लाट काही केल्या नियंत्रणात येत नाही. दरदिवशी कोरोनाची रुग्णसंख्या अडीच लाखांचा टप्पा पार करताना दिसतेय. शुक्रवारी देशात 2,57,299 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली असून 4,194 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 3,57,630 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आधी गुरुवारी देशात 2.59 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती तर 4209 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत एक लाख चार हजार 525 ने घट झाली आहे, तसेच कोरोनाच्या नव्या रुग्णांंपेक्षा कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही काहीसी दिलासादायक बाब आहे.
शुक्रवार, 21 मे पर्यंत देशात एकूण 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 14 लाख 58 हजार 895 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात 32 कोटी 64 लाखांहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 62 लाख 89 हजार 290
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 30 लाख 70 हजार 365
- एकूण सक्रिय रुग्ण : 29 लाख 23 हजार 400
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 95 हजार 525
देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.12 टक्के इतकं आहे तर रुग्ण मुक्त होण्याचं प्रमाण 87 टक्के इतकं आहे. जगातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आणि सक्रिय रुग्णांच्या बाबतील भारताचा दुसरा क्रमांक आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी राज्यातील 44,493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 50,70,801 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.7 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात शुक्रवारी 555 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,24,41,776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,27,092 (17.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,67,121 सक्रिय रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधासाठी नेल्लोरमध्ये तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार
- या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व प्रौढ भारतीयाचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी सक्षम : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचा दावा
- Covaxin : कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक? WHO कडून आपत्कालीन लसींच्या यादीत समावेश नाही