एक्स्प्लोर

कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधासाठी नेल्लोरमध्ये तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार

कोविड-19 झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधासाठी आंध्र प्रदेशातील कृष्णपटणम या गावात नागरिक तुफान गर्दी करत आहेत. औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यावर काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. तर गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आलं आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिल्या जातात.परंतु यावेळी कोरोनाविषयक नियमांचा पुरता बोजवारा उडत आहे.

नेल्लोर (आंध्र प्रदेश) : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. कोविड-19 वरील औषधासाठी संशोधन सुरु आहे.  तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने इथे येतात. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने आपलं हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला, परिणामी इथे दूरुन लोक येऊ लागले. इतकंच नाही तर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत. आनंदय्या यांनी तयार केलेल्या औषधाची तुलना हैदराबादमधील बथिनी बंधूंनी दमा बरा करण्यासाठी तयार केलेल्या 'फिश प्रसादम' औषधासोबत केली जात आहे.

दरम्यान हे आयुर्वेदिक औषध कोविड-19 वर प्रभावी आहे का, यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो का हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तरीही मोठ्या संख्येने नागरिक या गावात औषधासाठी गर्दी करत आहेत. परंतु हे औषध घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचा मात्र पुरता बोजवारा उडाला. 

लोकांना औषधाचं मोफत वाटप
कृष्णपट्टणम कोरोना औषध असं या आयुर्वेदिक औषधाचं नाव आहे. आनंदय्या आपलं आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. शिवाय ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना आयड्राप देखील दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. तर गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आलं आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिल्या जातात. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही या गोळ्या दिल्या जात आहेत.

उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून औषधाबाबत माहिती
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी कोविड-19 संबंधित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तर हे औषध प्रभावी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीएमआर आणि तर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितलं.

हे औषध कोविड-19 वर प्रभावी आहे की नाही, तसंच हे औषध बनवण्याची कृतीच्या संशोधनासाठी आंध्र प्रदेश सरकारने तज्ज्ञांचं पथक तसंच आयसीएमआरची एक टीम नेल्लोरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचाही औषधाचा अभ्यास करण्याचा सल्ला
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआरला या औषधावर संशोषन करायला सांगितल्याचं कळतं. व्यंकय्या नायडू देखील एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील आहेत.

औषधाचे दुष्परिणाम नाही; आमदार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
ज्यांनी हे औषध खाल्लं किंवा वापरलं त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत, असं आमदार के गोवर्धन रेड्डी यांनी सांगितलं. तर दुसरीकडे जिल्हा पंचायत अधिकारी धनलक्ष्मी याच्या नेतृत्त्वाखाली नेल्लोरचे जिल्हाधिकारी के व्ही एन चक्रधर बाबू यांनी एका समितीची नेमणूक केली असून त्यात आयुष डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय ज्या रुग्णांनी या औषधाचं सेवन केलं, त्यांच्यात दुष्परिणाम दिसले नाहीत, असंही म्हटलं. दरम्यान या औषधाचे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील आयुष प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget