एक्स्प्लोर

Coronavirus | दिलासादायक! देशात आतापर्यंत 102 रूग्ण कोरोनामुक्त; जाणून घ्या प्रत्येक राज्यातील स्थिती

कोरोनाने संपूर्ण देश वेठीस धरला असून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, देशातील अनेक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना व्हायरसचं संकट उभं ठाकलं आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी एकूण 102 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार पार पोहोचला आहे. तर आतापर्यंत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात किती रूग्ण झाले कोरोनामुक्त?

महाराष्ट्रात 25, केरळमध्ये 16, उत्तरप्रदेशमध्ये 11, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 5, दिल्लीमध्ये 6, तमिळनाडूत 4, लडाखमध्ये तीन, राजस्थानमध्ये तीन, हिमाचल प्रदेशमध्ये दोन, उत्तराखंडमध्ये 2, तेलंगणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि आंध्रप्रदेशमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती मृत्यू?

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले असून महाराष्ट्रात मृत्यू झालेल्यांची संख्या 7 आहे. त्यानंतर गुजरातमध्ये पाच, कर्नाटकात तीन, मध्यप्रदेश आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. केरळ, तेलंगणा, तमिळनाडू, जम्मू-काश्मिर, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडीओ : आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

देशात आतापर्यंत 11000 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे हैदोस घातला असून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 11000 हजार पार गेला आहे. देशातील 27 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1140 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन राज्य केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 200 पार पोहोचली आहे.

जगभरातही कोरोनाचा कहर जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून जगभरात एकूण 7 लाख 21 हजार 412 कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत 33 हजार 956 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 51 हजार 4 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 10 हजार 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्पेनचा दुसरा क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये 6803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काल स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचाही मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये शाही परिवारातील हा पहिला मृत्यू होता. अमेरिकेतही कोरोनाचा हैदोस पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2484 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 47 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या जगभरातील जवळपास 177 देश कोरोनाच्या सावटाखाली आहेत. संबंधित बातम्या :  Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget