Covid-19 | देशात गेल्या 24 तासांत 103 लोकांचा मृत्यू; आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
सध्या देशात कोरोना कहर सुरु आहे. सध्या देशात कोरोना बाधितांचा आकडा 86 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 2752 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 'आतापर्यंत 85 हजार 940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 2752 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 30 हजार 153 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घ्या देशभरातील सर्व राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती.
कोणत्या राज्यात किती मृत्यू?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 1068, गुजरातमध्ये 606, मध्यप्रदेशमध्ये 239, पश्चिम बंगालमध्ये 225, राजस्थानमध्ये 125, दिल्लीमध्ये 123, उत्तर प्रदेशमध्ये 95, आंध्रप्रदेशमध्ये 48, तामिळनाडूमध्ये 71, तेलंगणामध्ये 34, कर्नाटकात 36, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीरमध्ये 11, हरियाणामध्ये 11, बिहारमध्ये 7, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडिशामध्ये 3, चंदिगढमध्ये 3, हिमाचल प्रदेशमध्ये 3, आसाममध्ये 2 आणि मेघालयमध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना
पाहा व्हिडीओ : कोरोनाच्या 100 बातम्या, देशभरातील कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स
1 मे ते 15 मेपर्यंत भारतातील कोरोना बाधितांमध्ये वाढ
1 मेपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 35043 होती आणि 1147 रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु, 15 मेपर्यंत हा आकडा 81,970 पर्यंत पोहोचला आहे. मागील 15 दिवसांमध्ये 46,927 रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजेच, देशातील सध्याच्या कोरोना बाधितांच्या संख्येपैकी 57.24% रुग्ण मागील पंधरा दिवसांत आढळून आले आहेत. दरम्यान, देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 17 मेनंतर या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे.
1 मेपासून 15 मेपर्यंत 1502 लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे 1 मे ते 15 मेपर्यंत कोरोना व्हायरसमुळे 1502 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 मेपर्यंत 1147 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु, 15 मेपर्यंत 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, देशात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 56.70 टक्के लोकांचा मृत्यू 1 मे ते 15 मे दरम्यान झाले आहेत.
संबंधित बातम्या :
उत्तर प्रदेशातील औरैयात प्रवासी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 23 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार? सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना सूचना