एक्स्प्लोर

चिमुरड्याला सुटकेसवर ठेवून ओढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल, मानवाधिकार आयोगाची पंजाब, यूपी सरकारला नोटीस

चालून थकलेल्या एका लहान लेकराला त्याच्या आईने सूटकेसवर ठेवलं आणि सुटकेसला एक दोरी बांधून त्याला ओढत असतानाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.

नई दिल्ली: लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त हाल हे मजुरांचे होत आहेत. हातावर पोट असणारे हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने मिळेल त्या मार्गाने परतत आहेत. हजारो मजूर पायीच आपले गाव जवळ करत आहेत. या काळात अनेक भीषण चित्रं पाहायला मिळत आहेत.  आग्रा येथील एका राज्यमार्गावर एक प्रवाशी महिला आपल्या चिमुरड्याला सुटकेसवर ठेवून ओढत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सुटकेसवर चिमुरडा झोपलेला या व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. आयोगाने म्हटले आहे की, सध्याच्या या परिस्थितीबाबत सर्वांना माहीत आहेच आणि लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणींना केंद्र आणि राज्य सरकार गंभीरपणे सामोरे जात आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट आहे की त्या मुलाच्या आणि त्याच्या परिवाराच्या दुख:ला आणि त्रासाला स्थानिक अधिकारी वगळता रस्त्यावरील अनेक लोकांनी पाहिलं. आयोगानं म्हटलं आहे की, जर स्थानीय अधिकारी सतर्क असते तर त्या त्रासलेल्या परिवाराला आणि अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या अनेक लोकांना तात्काळ मदत पोहोचवली गेली असती. ही घटना मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या घटनेसारखी आहे. त्यामुळं या प्रकरणात एनएचआरसीच्या हस्तक्षेपाची गरज आहे. एनएचआरसीने म्हटलं आहे की, त्यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना आणि आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी करुन चार आठवड्यांच्या आत विस्तृत रिपोर्ट मागितला आहे. काय आहे प्रकरण? लॉकडाऊनमध्ये मजुरांचं स्थलांतर थांबण्याचं नाव घेत नाहीये.  हजारो मजूर पायीच आपले गाव जवळ करत आहेत. या काळात अनेक भीषण चित्रं पाहायला मिळत आहेत.  झाशी जिल्ह्याच्या महोबा येथील वीसेक लोकं पंजाबहून पायी घरी निघाले. चालून थकलेल्या एका लहान लेकराला त्याच्या आईने सूटकेसवर ठेवलं आणि सूटकेसला एक दोरी बांधून त्याला ओढत असतानाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget