Coronavirus Cases India : देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळले आहेत. काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला.

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 873
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 873 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 1755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 22 हजार 193 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 19 हजार 479 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
India reports 2,593 new COVID19 cases today: Active cases stand at 15,873 pic.twitter.com/9x6JUBQwNu
— ANI (@ANI) April 24, 2022
आतापर्यंत 187 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शनिवारी दिवसभरात देशात 19 लाख 13 हजार 296 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 46 लाख 72 हजार 536 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Kisan Yojana : मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी येणार पैसे?
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
- Russia Ukraine War : रशियाच्या क्रूरतेचं धक्कादायक वास्तव, युक्रेनच्या मारियुपोलमध्ये सापडली सामूहिक कबर, 1000 मृतदेह असण्याचा अंदाज























