Maharashtra Corona Update : राज्यात बी ए. 4 , बी ए. 5 व्हेरीयंटचे 19 रुग्ण तर बी. ए 2.75 चे 17 रुग्ण तर 2186 नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला.

मुंबई : राज्यात आज 2186 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2179 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात बी ए.5, बी ए. 4 व्हेरीयंटचे 17 रुग्ण तर बी ए. 2.75चे 17 रुग्ण
राज्यात बीए 5 व्हेरीयंट आणि बीए 4 व्हेरीयंटचे 17 रुग्ण आढळले आहेत. तर बी ए. 2.75 चे 17 रुग्ण आढळले आहेत.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,55,840 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.96 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 15525 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 15525 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2300 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1270 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण
देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसत आहे. देशात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात 17 हजार 790 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 30 लाख 81 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 449 इतकी आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
