(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 1111 कोरोना रूग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.97 टक्के
Maharashtra Corona Update : राज्यात एकूण 15162 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2232 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1208 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यात आज 1111 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 176 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात बी ए.5 व्हेरीयंटचे 26 रुग्ण तर बी ए. 2.75चे 13 रुग्ण
राज्यात बीए 5 व्हेरीयंचे 26 रुग्ण आढळले आहेत. तर बी ए. 2.75 चे 13 रुग्ण आढळले आहेत.
शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्युची नोंद झाली आहे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,57,314 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 15162 सक्रिय रुग्ण
राज्यात एकूण 15162 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2232 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1208 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील कोरोना रुग्णांचा आलेख घटला
देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात मागील चार दिवस दररोज वीस हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण आज कोरोना रुग्णांचा आलेख घसरला आहे. रविवारी दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1 लाख 44 हजार 264 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासाह आतापर्यंत देशात 4 कोटी 30 लाख 97 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.