Coronavirus in India : मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव, देशात 1082 नवे कोरोनाबाधित, सात रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : मुंबईत XBB व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे, त्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या नव्या XBB व्हेरियंटचा धोका वाढताना दिसत आहे. देशात आधीच कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईतही XBB व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. दरम्यान देशात आज 1082 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांवर पोहोचली आहे. तर भारतात गेल्या 24 तासांत सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव
नवीन ओमिक्रॉन सबवेरियंट्समुळे वाढत्या कोविड संसर्गामुळे जगाची चिंता वाढवली आहे. जगभरात कोरोनाच्या नव्या XBB व्हेरियंटचा संसर्ग पसरताना दिसत आहे. देशातही XBB व्हेरियंटचा शिरकाव झाला असून आता मुंबईमध्ये XBB व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत. महापालिकेकडून कस्तुरबा प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या 234 पैकी जवळपास 30 टक्के प्रकरणांमध्ये XBB आणि XBB.1 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
Single-day rise of 1,082 COVID-19 cases pushes India's tally to 4,46,59,447, death toll climbs to 5,30,486: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 5, 2022
देशात 15 हजारहून अधिक उपचाराधीन रुग्ण
देशात सध्या 15 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 239 ने कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत एक हजार 82 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 कोटी 46 लाख 59 हजार 447 वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 486 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
'कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता', WHO कडून धोक्याचा इशारा
सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे (Corona New Variant) चिंता वाढली आहे. शास्त्रज्ञांनी पुन्हा कोरोनाची नवीन लाट (Corona Wave) येण्याचा धोका व्यक्त केला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामधील (Omicron) नवीन XBB व्हेरियंटमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत.
चीनमध्ये 4045 नवे कोरोना रुग्ण
चीनमध्ये 4 हजार 45 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. एक दिवस आधी काल 3 हजार 837 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली होती. नव्याने आढळलेल्या 4045 रुग्णांपैकी 657 रुग्ण लक्षणे असलेले आणि 3,180 लक्षणे नसलेले आहेत.