Corona Update : कोरोनाचा वेग मंदावला! देशात 937 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा 14 हजारांवर
Coronavirus in India : दिलासादायक बातमी म्हणजे देशात एका हजारांहून कमी नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : जगभरात कोरोनाच्या ( Covid19 ) नव्या लाटेचा धोका ( Coronavirus Fifth Wave ) व्यक्त केला जात असताना भारतात दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत एक हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज भारतात 937 कोरोनाबाधित ( Coronavirus in India )आढळले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाल आहे. काल ही संख्या जास्त होती. काल देशात 1132 नवे रुग्ण आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान याआधी 26 ऑक्टोबर रोजी देशातील कोरोना रुग्णांचा आलेख एक हजारांच्या खाली गेला होता. 26 ऑक्टोबरला 830 रुग्णांची नोंद झाली होती. सहा महिन्यांनंतर पहिल्यांदा कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक घट पाहायला मिळाली होती.
महाराष्ट्रात 230 नवे कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात 230 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार 560 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Single-day rise of 937 Covid cases push India's infection tally to 4,46,61,516, death toll climbs to 5,30,509: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2022
सध्या देशातील कोरोना विषाणूचा वेग मंदावल्याचं दिसत आहे. असं असलं तरी, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे. पण, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, लसीकरणामुळे त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणं मात्र अत्यंत सौम्य प्रकारची आहेत.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजारांवर
देशातील कोरोना रुग्णांसोबतच कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात कोरोनावर उपचार घेत असलेले 14 हजार 515 रुग्ण आहेत. काल ही देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 839 होती. आज नोंद झालेल्या 937 नवीन कोरोना रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार कोटी 46 लाख 61 हजार 516 वर पोहोचली आहे. एकूण कोरोनाबाधितांपैकी आजपर्यंत 5 लाख 30 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Active Covid cases decline to 14,515 from 14,839 a day earlier: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2022
कोरोनाच्या लक्षणांमध्ये काळानुसार बदल
जगभरात मागील दोन वर्षांपासून हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा ( Coronavirus ) कहर आता कमी झाला असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोविड19 विषाणूमध्ये काळानुसार अनेक बदल झाले, त्याप्रमाणे कोरोनाच्या लक्षाणांमध्ये बदल झाल्याचं आढळून आलं आहे. एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे की, कोविडची लक्षणे ( Covid19 Symtoms ) देखील काळानुसार बदलत आहेत. आता कोरोना रुग्णांमध्ये तोंडाला चव नसणे किंवा गंध न येणे ही प्रमुख लक्षणं नाहीत. झो हेल्थच्या अहवालानुसार, घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक बंद होणे, सतत खोकला आणि डोकेदुखी ही सध्या कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत.