एक्स्प्लोर

India Corona Updates : धोका घटतोय! देशात 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद, 7591 नवे कोरोनाबाधित, 41 जणांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासांत 7,591 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.

Coronavirus Cases Today in India : अलिकडे देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशात तब्बल 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांची संख्या आठ हजारांच्या खाली गेली आहे. शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी 7 हजार 591 रुग्ण आढळले. कोरोना रुग्णसंख्येत 1 हजार 845 रुग्णांची घट झाली आहे.

गेल्या 24 तासांत 41 रुग्णांचा मृत्यू 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रविवारी दिवसभरात देशात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 597 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाचा आलेख घसरला

महाराष्ट्रात रविवारी 1639 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 1698 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,36, 576 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 814 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,18,661 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,688 झाली आहे. सध्या मुंबईत 4,969 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 610 रुग्णांमध्ये 570 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1042 दिवसांवर गेला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Embed widget