#CoronaVirus | तेलंगणासह दिल्ली, राजस्थानमध्येही कोरोनाचे रुग्ण; तर अमेरिकेत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा फटका चिकन आणि मटण क्षेत्रालाही बसला. आपल्यालाही कोरोना व्हायरस होईल या भीतीने अनेकांनी चिकन, मटण खाणे वर्ज्य केले. परिणामी मागील काही दिवसांपासून या क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका बसला.
नवी दिल्ली : भारतात पहिली कोरोना व्हायरस डिटेक्ट झालेल्यांमध्ये दोन रूग्णांची पॉझिटिव्ह केस समोर आली आहे. ज्यामध्ये एक रूग्ण दिल्लीमध्ये आहे, तर दुसरा रूग्ण तेलंगणामध्ये आहे. आता भारतात कोरोनाचे एकूण 5 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. तेलंगणा राज्याचे आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांनी राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. यातील एक रुग्ण इटलीहून तर दुसरा दुबईवरून भारतात आला असल्याचं समजत आहे. कोरोना व्हायरसवर अद्यापही उपाय शोधला गेलेला नाही, त्यासाठी कोणत्याही अधिकृत उपचाराचा शोध लागला नाही. यापूर्वीही भारतात तीन संशयित रुग्ण आढळले होते, हे रुग्ण केरळ आणि पश्चिम बंगालमधील होते. मात्र तिघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. भारताच्या आरोग्यमंत्रालयाने या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.
तेलंगणामध्ये झाली रूग्णाची चाचणी
तेलंगणामध्ये ज्या व्यक्तीला कोरोना असल्याचं समोर आलं आहे. तो रूग्ण 24 वर्षांचा असून बंगळूरूच्या कंपनीमध्ये सॉफ्टेवयर इंजिनियर आहे. 17 फेब्रुवारीला कंपनीच्या कामानिमित्ता तो दुबईला गेला होता. त्यानंतर तो हॉन्गकॉन्गला गेला होता. तिथून 20 फेब्रुवारीला तो भारतात परतला होता. भारतात सर्वात आधी केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रूग्ण समोर आले होते. यामध्ये चीनमधील विश्वविद्यालयात शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी स्वतः याबाबत माहिती हॉस्पिटलमध्ये दिली आणि त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे तिनही रूग्णांची प्रकृती सुधारली असून महिनाभरापूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून रिचार्ज देण्यात आला.
पाहा व्हिडीओ : देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
जयपूरमध्ये एक रूग्ण असण्याची शक्यता
जयपूरमध्येही कोरोनाग्रस्त रूग्ण असल्याची शक्यता वाढली आहे. त्याच्यावर हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी सांगितले की, जयपूरमध्ये एक पर्यटक कोरोना व्हायसने ग्रस्त असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 29 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या नमूण्यात त्याची कोरोनाची टेस्ट नेगेटिव्ह आली होती. परंतु, तब्बेत सतत ढासळत असल्याने त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. दुसऱ्या तपासणीत तो कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं.
अमेरिकेत कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे अमेरिकेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोनवरून सहावर पोहोचली आहे. चीनमधील वुहानपासून पसरलेला कोरोना व्हायरस 70 देशांपर्यंत पोहोचला आहे. देशभरात कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा 3 हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे.
मांसाहार विक्रेत्यांनाही कोरोनाचा फटकाकोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा फटका चिकन आणि मटण क्षेत्रालाही बसला. आपल्यालाही कोरोना व्हायरस होईल या भीतीने अनेकांनी चिकन, मटण खाणे वर्ज्य केले. परिणामी मागील काही दिवसांपासून या क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका बसला. परंतु, सरकारने मागील काही दिवसांपासून याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून त्याचे सकारात्मक परीणामही आता पाहण्यास मिळत आहेत. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका चिकन फेस्टिव्हलला नागरिकांनी प्रचंड गर्दी केलीय. या फेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्याणी आणि चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय. येथील पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी तब्बल एक किमीहुन अधिक मोठी रांग लावली होती.
नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :
#CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश