Corona Vaccine Roumers | कोरोना लसीबाबत सोशल मीडियावर अफवा; लस घेतली तरी कोरोना होतो?
कोरोना लस घेण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या गोष्टी पसरवत आहेत. कोणी नपुंसकत्व याबद्दल बोलत आहे तर कुणी त्यात हराम आणि हलालचा अँगल जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई : एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट घडली की अनेकजण आपापली त्याबद्दलची मतं तयार करतात आणि त्याची एखादी गोष्ट तयार करतात. यामुळे एक अफवा निर्माण होते आणि अनेकदा त्या सोशल मीडियावरह व्हायरल होतात. अशाचरीतीने कोरोना आजाराविषयी आणि आता कोरोना लसीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत. कोरोनाबाबत काहीजण हा परदेशातील कट असल्याचे सांगत आहेत. तर काहीजण तिची लस घेण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या गोष्टी पसरवत आहेत. कोणी नपुंसकत्व याबद्दल बोलत आहे तर कुणी त्यात हराम आणि हलालचा अँगल जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना अफवांमध्ये अडकू नये, असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, कोरोना लसीबाबत ज्या प्रकारच्या अफवा पसरल्या जात आहेत त्या त्वरित थांबवल्या पाहिजेत. सोशल मीडियाच्या या युगात एक खोटेपणा इतका पसरला जातो की ते सत्य वाटू लागतं. मात्र अशा परिस्थितीत संयम ठेवण्याची अधिक गरज आहे.
सोशल मीडियावरील कोरोनाबाबतच्या अफवा
- कोरोना लस घेतल्याने देखील कोरोना होऊ शकते.
- कोरोना लस घेतल्याने एखादा दुसरा घातक आजार होऊ शकतो.
- कोरोनाची लस मुस्लिमांची वाढती लोकसंख्या रोखण्याचा कट आहे.
- कोरोना लस वापरल्याने नपुंसकत्व येते.
- कोरोना लसी तयार करण्यात डुकराच्या मांसाचा वापर करण्यात आला आहे.
या काही अफवा आहेत ज्या समोर आल्या आहेत. मात्र पडताळणीनंतर या अफवा खोडून काढल्या जात आहेत. पण या व्यतिरिक्त आजकाल अनेक विचित्र प्रश्न व उत्तरे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यापैकी कोणत्याही अफवा सत्याच्या अगदी जवळ नसतात. अशा परिस्थितीत आपण सत्याच्या जवळ राहिलं पाहिजे आणि अफवांना संपवले पाहिजे. कारण जेव्हा देशात पोलिओ डोसद्वारे लसीकरण चालू होते, तेव्हा अशाच काही अफवा उठवल्या गेल्या ज्या नंतर निराधार असल्याचे सिद्ध झाले. यामुळेच नंतर भारत पोलिओमुक्त देश बनला झाला. आता आपल्याला कोरोनाविरूद्धही तशाच प्रकारे लढा द्यावा लागेल आणि अशा अफवा त्यांच्या दरम्यान अडथळा बनू देऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
संबंधित बातम्या