एक्स्प्लोर
Advertisement
मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं आडनाव, राहुल गांधींचा घणाघात
आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाची सांगता झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी हे टीकास्त्र सोडलं. याशिवाय, भाजप म्हणजे संघाचा आवाज असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
नवी दिल्ली : मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालं आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाची सांगता झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी हे टीकास्त्र सोडलं. याशिवाय, भाजप म्हणजे संघाचा आवाज असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी आणि ललित मोदींसारख्यांचं भलं केलं. अमित शाह यांच्या मुलाला गडगंज केलं. पण सामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलं,” असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला. शिवाय, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलीनं नीरव मोदीला मदत केल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.
तसेच आगामी काळात काँग्रेसमध्ये अमुलाग्र बदलाची गरज असल्याचं मतही राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केलं. त्यासाठी त्यांनी त्रिसूत्री जाहीर केली. पक्षामध्ये नेते आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये उभ्या असलेल्या भिंतीला पाडण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी केला. तसेच, तरुण मतदार आणि काँग्रेस नेत्यांमधलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
शिवाय सत्तेत आल्यास तरुणांना रोजगार आणि शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचंही राहुल गांधी यांनी जाहीर केलं. तसेच मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यावरुनही शिवराज सिंह सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच, कुणालाही न घाबरण्याचा सल्ला राहुल गांधींनी माध्यमांना दिला.
देशाला विजयपथावर न्यायचं असेल, तर फक्त एका धर्माला नाही. तर सर्व धर्मांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. तसेच 2019 मध्ये काँग्रेसचीच सत्ता पुन्हा देशात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
LIVE UPDATE
चूक मान्य करण्याचा उदारपणा भाजपमध्ये नाही : राहुल गांधी
नोटाबंदीची चूक संपूर्ण जगाने दाखवून दिली, पण मोदींनी मान्य केली नाही : राहुल गांधी
मोदींना 2019ची भीती वाटतीय : राहुल गांधी
काँग्रेसचा हात सर्वांचं रक्षण करेल : राहुल गांधी
संघाला देशभरातील सर्व संस्था मोडित काढायच्या आहेत : राहुल गांधी
मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यावरुनही राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
देशाला बदलण्याची ताकद फक्त तरुणांमध्येच आहे : राहुल गांधी
नेता आणि कार्यकर्तामधील भिंत आम्ही तोडणार : राहुल गांधी
काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही : राहुल गांधी
देशातील तरुणांना रोजगार फक्त काँग्रेसच देऊ शकतो : राहुल गांधी
भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं, काँग्रेसचा जनतेसाठी काहीही करु शकतं : राहुल गांधी
मोदी आडनाव भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालंय : राहुल गांधी
काँग्रेस देशाचा आवाज, तर भाजप संघाचा आवाज : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement