Ashok Gehlot : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, अशोक गहलोत यांची घोषणा; सोनिया गांधींची माफीही मागितली
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अजून एक नवं वळण मिळालं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक लढवणार नाही, असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.
Ashok Gehlot Congress President News: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक लढवणार नाही, असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या चर्चेमध्ये अशोक गहलोत यांनी आता हे स्पष्टीकरण दिल्यानं आता पुन्हा काँग्रेस अध्यक्ष कोण? हा प्रश्न समोर उपस्थित राहिला आहे. अशोक गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल अशी चर्चा देखील रंगली होती.
I met Rahul Gandhi in Kochi & requested him to fight in the polls (for Congress President). When he didn't accept, I said I'll contest but now with that incident (#RajasthanPoliticalCrisis), I've decided not to contest the elections: Rajasthan CM Ashok Gehlot, in Delhi pic.twitter.com/2VnqTcQUAu
— ANI (@ANI) September 29, 2022
अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, मी संपूर्ण मुद्दे आजच्या बैठकीत त्यांच्यासमोर ठेवले. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश संपूर्ण देशात असा गेला आहे की, मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, असंही ते म्हणाले.
गहलोत यांनी म्हटलं की, मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली. जेव्हा त्यांनी ते मान्य केले नाही, तेव्हा मी म्हणालो की मी लढेन पण आता त्या घटनेमुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.
I met Rahul Gandhi in Kochi & requested him to fight in the polls (for Congress President). When he didn't accept, I said I'll contest but now with that incident (#RajasthanPoliticalCrisis), I've decided not to contest the elections: Rajasthan CM Ashok Gehlot, in Delhi pic.twitter.com/2VnqTcQUAu
— ANI (@ANI) September 29, 2022
या वातावरणात मी नैतिक जबाबदारीने निवडणूक लढवू शकणार नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहाल का? असं विचारलं असता ते म्हणाले की, ते मी ठरवणार नाही, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे याबाबत निर्णय घेतील, असं गहलोत यांनी म्हटलं.
इतर महत्वाच्या बातम्या
गेहलोत यांच्यावर अनुशासनहीनता ठपका, कमलनाथ यांनी दिली क्लीन चिट