Santokh Singh Chaudhary : काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन; भारत जोडो यात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा झटका, यात्रा स्थगित
Bharat Jodo Yatra Stopped : काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं भारत जोडो यात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे. यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे.

Santokh Singh Chaudhary Death : पंजाबच्या (Punjab) जालंधर येथील काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Choudhary) यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह यांना शनिवारी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत फिल्लोर येथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले असताना अचानक ते जमिनीवर कोसळले, त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भारत जोडो यात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा झटका
काँग्रेस नेते गुरजित सिंह आणि विजय इंदर सिंगला यांनी संतोख सिंह चौधरी यांच्या निधनाची बातमी देत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं भारत जोडो यात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे. त्यामुळे सध्या भारत जोडो यात्रा पंजाबमधील फिल्लोर येथे स्थगित करण्यात आली आहे.
Congress suspends Bharat Jodo Yatra after Jalandhar MP's demise, cancels Rahul Gandhi's press conference
— ANI Digital (@ani_digital) January 14, 2023
Read @ANI Story | https://t.co/DyIgfOotuY#BharatJodoYatra #RahulGandhi #Punjab #Jalandhar pic.twitter.com/DC4ypcozpF
भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित
दरम्यान, भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेचा पुढील कार्यक्रम कालांतराने ठरवण्यात येईल. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते संतोख सिंह यांना श्रद्धांजलि देण्यासाठी आणि कुटुंबियाच्या दु:खामध्ये सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी व्यक्त केला शोक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचे खासदार संतोख सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना. त्यांचा आत्म्याला शांती लाभो.
पाहा व्हिडीओ : काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचेही ट्वीट
संतोख सिंह यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत लिहिले आहे की, जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही चौधरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
संतोख सिंह यांचा राजकीय प्रवास
काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी हे पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. संतोख सिंह पंजाब काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. 2004 ते 2010 पर्यंत ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. 2002 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर फिल्लौर विधानसभेची जागा जिंकून ते पंजाब विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
