एक्स्प्लोर

काँग्रेसच्या वर्धापन दिनीच राहुल गांधी इटलीला रवाना

28 डिसेंबरला देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाता स्थापना दिवस अर्थात वर्धापन दिन. विविध स्तरांतून आणि माध्यमातून पक्षासाठी महत्त्वाचा असणारा हा दिवस साजरा केला जात असतानाच, पक्षातील प्रमुख चेहरा असणाऱ्या राहुल गांधी यांनी मात्र परदेश दौऱ्याला प्राधान्य दिलं आहे.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणाही साधला होता. पण, आता मात्र राहुल गांधी यांच्यावरच भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. यामागचं कारणंही तसंच ठरलं आहे.

(Congress) काँग्रेस, या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा दिवस अतिशय खास समजला जात असतानाच राहुल गांधींची मात्र अनुपस्थिती असेल. पक्षाच्या वर्धापन दिनाच्याच दिवशी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले असल्याची बाब समोर येत आहे. जे कळताच भाजप नेते गिरीराज सिंह यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

राहुल गांधी यांची भारतातील सुट्टी संपली आहे. आता ते इटलीला परत गेले आहेत, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधला. फक्त सिंह नव्हे तर, गांधी यांचा हा परदेश दौरा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना वाव देत आहे.

28 डिसेंबर हा दिवस काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं फार महत्त्वाचा. 2020 या वर्षात याच दिवशी काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. पण, या साऱ्या वातावरणात राहुल गांधी मात्र कुठेच दिसत नाहीयेत. ते एका खासही कारणामुळं परदेश वारीला गेल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राहुल गांधी पुढील काही दिवस परदेश दौऱ्यावर असतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी नेमके कुठे गेले याची माहिती सुरजेवाला यांनी दिलेली नसली तरीही सूत्रांच्या माहितीनुसार ते इटलीला गेले असल्याचं म्हटलं जात आहे. ते कतार एअरवेजच्या विमानानं इटलीतील मिलान येथे रवाना झाले असल्याचं कळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonawane on Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या; बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या; बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानला, थोड्याचवेळात राजीनामा देणार
धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानला, थोड्याचवेळात राजीनामा देणार
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Meet Dhananjay Deshmukh:जरांगेंना भेटताच धनंजय देशमुखांनी टाहो फोडला,हमसून हमसून रडलेTop 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 6 AM : 04 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 4 March 2025 | ABP MajhaDevendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Sonawane on Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या; बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या; बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानला, थोड्याचवेळात राजीनामा देणार
धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानला, थोड्याचवेळात राजीनामा देणार
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश, धनंजय देशमुख म्हणाले, मला त्यावर काहीच...
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले...
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक, दुकानं-कार्यालयं बंद, रस्त्यांवर चिडीपूच शांतता
संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक, दुकानं-कार्यालयं बंद, रस्त्यांवर चिडीपूच शांतता
Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
भारताच्या जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के राहणार, आरबीआय रेपो रेट 5.50 टक्क्यांवर आणण्याची शक्यता, कर्जदारांना दिलासा,क्रिसिलचा अंदाज
जीडीपी वाढीचा दर वाढणार, रेपो रेट घटणार, आरबीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता, क्रिसिलचा अंदाज
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
Embed widget