एक्स्प्लोर

Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, Nifty 18000 च्या आत तर Sensex 335 अंकांनी घसरला

Stock Market Updates: मेटल आणि पॉवरच्या इंडेक्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे, तर कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि रिअॅलिटी शेअर्समध्ये 0.5 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली.

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी नुकसानीचा ठरला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 335 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ( Nifty) आज 89 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.55 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,506 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 0.50 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,764 वर पोहोचला. आज शेअर बाजारातील 1850 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1653 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकून 185 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

शेअर बाजार बंद होताना आज Divis Laboratories, Hindalco Industries, JSW Steel, Tata Steel आणि Kotak Mahindra Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तर Adani Ports, IndusInd Bank, BPCL, Hero MotoCorp आणि Apollo Hospitals या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. 

आज बाजार बंद होताना (Share Market Closing Bell मेटल आणि पॉवरच्या इंडेक्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली. तर कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि रिअॅलिटी शेअर्समध्ये 0.5 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये 0.7 टक्क्यांची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. 

Rupee Close: रुपया 90 पैशांनी घसरला

आज शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय रुपयाच्या किमतीवर झाल्याचं दिसून आलं. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 90 पैशांनी घसरली असून आज रुपयाची किंमत 81.83 इतकी झाली. 

सुरुवातीला बाजारातील परिस्थिती काय?

आज बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्स 192.7 अंकांच्या घसरणीनंतर 60,649.18 वर आला होता. याशिवाय निफ्टी 17,790 वर आला असून तो 64.05 अंकांच्या घसरणीने व्यवहार करत होता. प्री-ओपनिंगमधील शेअर बाजाराची परिस्थिती पहिली तर, NSE चा निफ्टी 7.40 अंकांच्या वाढीसह 17861 च्या पातळीवर व्यवहार करत होता. याशिवाय बीएसईचा सेन्सेक्स 36.36 अंकांच्या म्हणजेच 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 60878 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

आज या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Adani Ports- 9.34 टक्के
  • IndusInd Bank- 2.32 टक्के
  • BPCL- 2.16 टक्के
  • Apollo Hospital- 1.63 टक्के
  • Hero Motocorp- 1.54 टक्के

आज या शेअर्समध्ये घट झाली

  • Divis Labs- 3.69 टक्के
  • JSW Steel- 2.84 टक्के
  • Hindalco- 2.68 टक्के
  • Tata Steel- 2.41 टक्के
  • Kotak Mahindra- 1.87 टक्के

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget