एक्स्प्लोर

शांततेच्या चर्चा करतानाच उत्तराखंडमध्ये चीनची घुसखोरी

उत्तराखंडच्या बाराहोटीत गेल्या महिन्यात म्हणजे 30 ऑगस्ट रोजी चीनी सैनिकांनी LAC ओलांडली. जवळ जवळ तीन तास चिनी सैनिक इथं होते.

 एकीकडे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे भारताच्या भूभागात घुसखोरी करायची असा दुतोंडी कारभार चीन करू लागला आहे. लडाखमध्ये सैनिकांची जमवाजमव करीत असतानाच आता उत्तराखंडच्या बाराहोटीत चीनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनवर आता भारतानं करडी नजर ठेवून जशास तसं प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे.

चीनने गेल्या वर्षी लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. भारतीय सैन्यानं चीनची घुसखोरी मोडून काढली होती. भारतीय सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत चीनचे अनेक सैनिक ठार झाले होते. त्यानंतर चीनने माघार घेतली आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरु केली. या चर्चेच्या जवळ-जवळ दहा ते बारा फेऱ्या पडल्या होत्या. चीन आता शांत होईल असे वाटत असतानाच चीननं पुन्हा हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर लडाखजवळील सीमाभागात त्यांच्या सैन्यासाठी तंबूच्या ऐवजी पक्की घरे बांधल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय सीमेवरील भारतीय सैन्याची माहिती गोळा करण्यासाठी ड्रोनचा वापरही सुरु केल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारतानेही आता चीनच्या या कारवायांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच भारताने पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर एलएसीवर पाळत ठेवली आहे. भारतीय लष्करानं आपल्या ताफ्यात नवीन इस्रायली आणि भारतीय ड्रोनचा समावेश केलाय.

यातच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. उत्तराखंडच्या बाराहोटीत गेल्या महिन्यात म्हणजे 30 ऑगस्ट रोजी चीनी सैनिकांनी LAC ओलांडली. जवळ जवळ तीन तास चिनी सैनिक इथं होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तून-जून ला' ओलांडून 55 घोडे आणि 100  हून अधिक चिनी सैनिक भारतीय हद्दीत  पाच किलोमीटरहून पुढे आले होते. तेथे भारतीय सैन्य नव्हते. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैनिक घटनास्थळावर दाखल होईपर्यंत चिनी सैनिक परत गेले होते. चीनी सैन्य परत गेले खरे पण जाताना या भागात मोठं नुकसान करून गेले. 1962 च्या युद्धाआधीही चीनने इथेच घुसखोरी केली होती. चीनी सैन्यानं त्यांनी बाराहोटीतील पायाभूत सुविधांचं नुकसान केलं आणि जाताना एक पूलही तोडला. इकोनॉमिक टाईम्स वृत्तपत्रानं संरक्षण दलातील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे

पण एकूणच चीनच्या कारवाया पाहाता पुढील काही महिने भारत-चीनमध्ये चकमकी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget